टेंभुर्णी-दे. राजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:14 AM2020-02-27T00:14:27+5:302020-02-27T00:14:51+5:30

टेंभुर्णी- देऊळगावराजा सडकेवर पापळ फाट्याजवळ झालेल्या एका मोटारसायकल अपघातात एक तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले

Tentacles One killed in a two-wheeler accident on King Road; Two serious | टेंभुर्णी-दे. राजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

टेंभुर्णी-दे. राजा रोडवर दुचाकी अपघातात एक ठार; दोन गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : टेंभुर्णी- देऊळगावराजा सडकेवर पापळ फाट्याजवळ झालेल्या एका मोटारसायकल अपघातात एक तरुण ठार तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.
जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील गजानन शेषराव वरगणे, रामेश्वर वरगणे व टेंभुर्णी येथील भगवान आश्रुबा कावळे हे तिघे मोटारसायकल क्र. एमएच २१ बीएल ९९०५ ने उशिरा रात्री टेंभुर्णीकडे येत होते.
दरम्यान, त्यांची मोटारसायकल पापळ फाट्याजवळ वळणावर आल्यानंतर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात सावंगी येथील तरुण शेतकरी गजानन वरगणे ( ३८) जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना टेंभुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयातून जालना येथे हलविण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेचा अधिक तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे फौजदार ज्ञानेश्वर साखळे, बीट जमादार पंडित गवळी करीत आहे.
मयत गजाननचे टेंभुर्णी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर बुधवारी सकाळी सावंगी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात वृध्द वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
यापूर्वीही या वळण रस्त्यावर अपघात झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
हा अपघात मंगळवारी रात्री उशिरा झाल्याने व अपघातातील तिघे सडकेच्या कडेला खड्यात फेकले गेल्याने मयतासह दोघे जखमी रात्रभर तिथेच पडून होते. सकाळी मॉर्निग वॉकला गेलेल्यांना विव्हळण्याचा आवाज आल्याने त्यांनी लगेच टेंभुर्णी पोलिसांना कळविले. त्यानंतर टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोकॉ. त्र्यंबक सातपुते, क्षीरसागर, राजेंद्र सानप, बळीराम तळपे, प्रदीप धोंडगे यांनी घटनास्थळी लगेच धाव घेऊन मयतासह जखमींना तातडीने टेंभुर्णी रूग्णालयात दाखल केले.

Web Title: Tentacles One killed in a two-wheeler accident on King Road; Two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.