शिक्षिका नीता आरसुळे यांना शिक्षक गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:53+5:302021-02-07T04:28:53+5:30

औरंगाबाद जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ‘घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा’ या उपक्रमामार्फत जालना जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करून सक्रिय सहभाग नोंदविला. ...

Teacher Gaurav to teacher Nita Arsule | शिक्षिका नीता आरसुळे यांना शिक्षक गौरव

शिक्षिका नीता आरसुळे यांना शिक्षक गौरव

औरंगाबाद जिल्हा परिषदेतर्फे आयोजित ‘घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा’ या उपक्रमामार्फत जालना जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करून सक्रिय सहभाग नोंदविला. शिक्षिका आरसुळे यांनी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिकविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न केले. शालेय स्तरावर स्काइपच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी व शिक्षकांची संवाद साधला. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले, औरंगाबादचे शिक्षण उपसंचालक अनिलकुमार साबळे, शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल, प्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्यसंपर्क प्रमुख संतोष राजगुरू, अधिकारी बटुळे, तायडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थी हे मुळातच खूप हुशार असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तरच त्यांचा सर्वांगीण विकास होतो. या विद्यार्थ्यांसाठी काम करताना खूप समाधान मिळते. या कामासाठी माझे कुटुंब, शाळेतील सहकारी, तसेच समाजातील विविध प्रकारच्या लोकांची मदत होऊ शकली. त्यामुळे हे एवढे यश संपादन करता आले.

नीता आरसुळे, शिक्षिका, जिल्हा परिषद, दोदडगाव

Web Title: Teacher Gaurav to teacher Nita Arsule