शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील टँकर कमी होईना; भर पावसाळ्यात टँकरची संख्या पुन्हा २७५ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:50 IST

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते.

जालना : पावसाळा सुरू होऊन सुमारे ४५ दिवसांचा कालावधी झालेला असला तरी, जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. जुलै महिना सुरू झालेला असला तरी, अद्याप जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती संपलेली नसल्याचे दिसून येत आहे. सध्या जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ७ जूनपासून जिल्ह्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे.

हंगामाच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे यंदा पाऊस चांगला बरसेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने दडी दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. मात्र, जालना जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. यामुळे भरपावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली आहे.

मागील वर्षी हीच स्थितीमागील वर्षीदेखील कमी पावसामुळे पावसाळ्यात टँकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदादेखील अशीच स्थित जिल्ह्यात दिसून येत आहे. मागील वर्षी २५ जुलै रोजी २२० टँकरद्वारे जिल्ह्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा २८ जुलै रोजी जिल्ह्यात १६७ गावे आणि ४५ वाड्यांना २७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

३१ जुलैपर्यंत मुदतमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात टंचाई निवारण आराखड्यास मंजुरी दिली होती. टंचाई आराखड्याची मुदत ३१ जून रोजी संपली होती. मात्र, कमी पाऊस झाल्याने अनेक गावांमध्ये भीषण टंचाई सुरू होती. यामुळे टंचाई आराखड्यास ३१ जुलैपर्यंंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु, टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आराखड्यात पुन्हा मुदतवाढ देण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

भोकरदन शहरात ३५ टँकर सुरूसध्या भोकरदन शहरातील नागरिकांची तहान मागील आठ महिन्यापासून टँकरच्या पाण्यावर भागविण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुई धरण पूर्णपणे काेरडे पडलेले असल्याने भोकरदन शहराला पावसाळ्यातदेखील टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. सध्या शहरात ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :WaterपाणीJalanaजालनाRainपाऊस