शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

खाते नसलेल्या जिल्हा बँकेत शेतकऱ्यांना अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान उशिराने प्राप्त झाले आहे. परंतु, शेतकऱ्यांची खाती महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ...

आन्वा : भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान उशिराने प्राप्त झाले आहे. परंतु, शेतकऱ्यांची खाती महाराष्ट्र ग्रामीण बँकेत असताना हे अनुदान जिल्हा बँकेतच्या यादीत आले आहे. त्यामुळे अनुदान उचलण्यासाठी शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

वाकडी येथील अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या भोकरदन शाखेत आहेत. परंतु, भोकरदन तहसील कार्यालयाने ज्या बँकेत लाभार्थी शेतकऱ्यांचे खाते नाही त्या बँकेत दुष्काळी अनुदानाची यादी दिली आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, रोगराईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रशासकीय गोंधळामुळे जिल्हा बँकेत चकरा माराव्या लागत आहेत. आन्वा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत नवीन खाते उघडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून, खाते उघडण्यासाठीही पैसे मोजावे लागत आहेत. त्यात येणारा इतर खर्च हा वेगळाच आहे. तसेच आन्वा गावाला जाण्यासाठी बस नाही. तसेच मध्यवर्ती बँकेत नवीन खाते उघडले की खात्यावर पाचशे रुपये ठेवावे लागतात. जर आज मध्यवर्ती बँकेत खाते खोलले तर कमीत कमी शेतकऱ्यांचे नगदी आठशे रुपये जातात. मध्यवर्ती बँकेत पैसे नसले की पुन्हा बँकेत पैशांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे हे अनुदान महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत वर्ग करावेत, अशी मागणी वाकडी येथील पोलीस पाटील महादू सिरसाठ, राजू सिरसाठ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.