त्या बेपत्ता महिलेचा २४ तासात शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:10+5:302021-06-24T04:21:10+5:30

नंदाबाई चव्हाण या सासरी वाद होत असल्याने माहेरी खैरपांगरी (ता. मंठा) येथे राहत होत्या. लॉकडाऊन संपल्याने मुलांच्या शाळा सुरू ...

Search for the missing woman in 24 hours | त्या बेपत्ता महिलेचा २४ तासात शोध

त्या बेपत्ता महिलेचा २४ तासात शोध

नंदाबाई चव्हाण या सासरी वाद होत असल्याने माहेरी खैरपांगरी (ता. मंठा) येथे राहत होत्या. लॉकडाऊन संपल्याने मुलांच्या शाळा सुरू होतील म्हणून तीन दिवसापूर्वी त्या कर्णावळ येथे सासरी आल्या होत्या. परंतु, सोमवारी मंठा येथून मुलाला दवाखान्यातून आणते, असे म्हणून महिमा चव्हाण, मयुरी चव्हाण व मुलगा अक्षय चव्हाण यांना घेऊन गेल्या. याप्रकरणी महिलेचा पती संतोष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे व पोकॉ संदीप राठोड यांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यांनी महिलेच्या नातेवाईकांंना विचारपूस केली. त्यांना सदरील महिला मुंबई येथील भावाकडे गेल्याचे समजले. त्यांनी महिला व मुलांना ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

Web Title: Search for the missing woman in 24 hours