शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वर्र्षांपूर्वीचे दक्षिणमुखी रोकडोबा मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 23:59 IST

भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथे जागृत दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे.

- गोकुळ सपकाळ, जळगाव स.भोकरदन तालुक्यातील आडगाव भोंबे येथे जागृत दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर आहे. भक्तांच्या मनोकामना व नवसाला पावणारा हनुमान म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. हे मंदिर दक्षिणमुखी रोकडोबा महाराज मंदिर म्हणून देखील ओळखले जात आहे. हजारो वर्षांपूर्वी ग्रामस्थांतर्फे या हनुमान मंदिराची स्थापना केलेली आहे. येथे जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. दर अमावास्येला येथे भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळते.हजारो वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रवाहासोबत एक दगडाची शिळा वाहत आली आणि गावातील एका जागी थांबली. यानंतर ग्रामस्थांकडून त्याच जागेवर मूर्तीची पूजा- आरती करण्यात आली. कालांतराने मंदिर बांधकामाच्या वेळी मूर्तीला हलविण्याचे नागरिकांनी ठरविले. याचवेळी गावातील वानरांनी संपूर्ण गावामध्ये ओरडून आक्रोश सुरू केला. हा प्रकार दोन दिवस सुरू होता. यानंतर हनुमंतांची मूर्ती आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. यासह अनेक आख्यायिका या हनुमंताच्या मूर्तीच्या आहेत. विशेष म्हणजे येथील हनुमान मूर्तीला शेंदूर लावला जात नसून, तेलाने अभिषेक केला जातो. तसेच तेलानेच स्नान घातले जाते. यामुळे या हनुमंताच्या मूर्तीचा शनीशी संबंध असल्याचे भक्तगण सांगतात. जो कोणी व्यक्त मनोभावे या मूर्तीपुढे नतमस्तक होईल, त्यावरील संकटे दूर होतात, अशी भक्तांची धारणा आहे. दक्षिणमुखी हनुमान मूर्तीच्या दर्शनासाठी दर अमावास्येला भाविक येतात. मूर्तीला अभिषेक करतात.

टॅग्स :MarutiमारुतीTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळे