जिल्ह्यात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:02+5:302021-02-07T04:29:02+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा शनिवारी मृत्यू झाला. तर शनिवारीच २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

Report of 21 people in the district is positive | जिल्ह्यात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा शनिवारी मृत्यू झाला. तर शनिवारीच २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशस्वी उपचारानंतर ३३ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ८५१ वर गेली असून आजवर ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ३३० जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना शहरातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली. परतूर तालुक्यातील रोहिणा येथील एक, तर घनसावंगी तालुक्यातील भुतेगाव १, मानेपुरी येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बदनापूर शहरातील एकास, तर जाफराबाद शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. भोकरदन शहरातील एक, तर बुलढाणा जिल्ह्यातील २, परभणी येथील एकास कोरोनाची बाधा झाली.

Web Title: Report of 21 people in the district is positive