रख्माजी कोल्हे यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:08+5:302021-02-14T04:28:08+5:30

सेवानिवृत्तीनिमित्त जाधव यांचा सत्कार वडीगोद्री : येथील तालुका फळ रोपवाटिकेत कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक एकनाथ जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार ...

Rakhmaji Kolhe elected as President | रख्माजी कोल्हे यांची अध्यक्षपदी निवड

रख्माजी कोल्हे यांची अध्यक्षपदी निवड

सेवानिवृत्तीनिमित्त जाधव यांचा सत्कार

वडीगोद्री : येथील तालुका फळ रोपवाटिकेत कार्यरत असलेले कृषी पर्यवेक्षक एकनाथ जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे, के. के. उपाध्ये, कृषी पर्यवेक्षक शेख अहमद, खादोंडे, निगवेकर, गजेवार, शिवाजी घाडगे, दुनगे आदींची उपस्थिती होती.

निवृत्त शिक्षकांना वेतन देण्याची मागणी

जालना : प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे निवृत्त शिक्षकांचे वेतन थकले आहे. वेतन थकलेल्या निवृत्तांना तत्काळ वेतन द्यावे, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. निवेदनावर शाखेचे अध्यक्ष जी. एस. शेख, व्ही. बी. व्यास, एम. जी. जोशी, व्ही. बी. धोत्रे आदींची नावे आहेत.

गाव विकासासाठी संवाद महत्त्वाचा : पेरे

अंबड : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांमधील संवाद महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी केले. तालुक्यातील देशगव्हाण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पेरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण तंट्यात वाढ होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Rakhmaji Kolhe elected as President