राजुरेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:26+5:302021-02-16T04:32:26+5:30

श्री जन्मोत्सवानिमीत्त श्रींस मुकूट, वस्त्रालंकार चढविण्यात आले होते. त्यामुळे श्रींची मूर्ती तेजोमय दिसत होती. हा अभूतपूर्व सोनेरी क्षण डोळयात ...

Rajureshwar Janmotsav celebrated with enthusiasm | राजुरेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

राजुरेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

श्री जन्मोत्सवानिमीत्त श्रींस मुकूट, वस्त्रालंकार चढविण्यात आले होते. त्यामुळे श्रींची मूर्ती तेजोमय दिसत होती. हा अभूतपूर्व सोनेरी क्षण डोळयात टिपण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. ह.भ.प.भगवान महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर भाविकांना बंद पॉकिटात महाप्रसाद वाटप करण्यात आला. गेल्या सप्ताह भरात कीर्तनकारांनी हजेरी लावून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. राजुरेश्वराच्या जयघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यंदा कोरोना संकटामुळे सोहळयाची परंपरा खंडित होवू नये, म्हणून मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करण्यात आला.

याप्रसंगी सोहळयात योगदान देणाऱ्यांचा सप्ताह समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी आ. नारायण कुचे, विश्वस्त साहेबराव भालेराव, उपसभापती भास्करराव दानवे, शालीकराव म्हस्के, सुधाकरराव दानवे, जि.प.सदस्य कैलास पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, शिवाजी पुंगळे, विष्णू महाराज सास्ते, बद्रीनाथ पठाडे, सिध्दीविनायक मुळे, उषाताई तोडावत, आशा साबळे, गणेश साबळे, प्रशांत दानवे, शेषराव जायभाये, विष्णू राज्यकर, भिकनराव पुंगळे, गजानन जामदार, श्रीमंता पुंगळे, श्रीरामपंच पुंगळे, विनोद डवले, भगवान नागवे, आप्पासाहेब पुंगळे, जगन्नाथ थोटे, ज्ञानेश्वर पुंगळे, रामेश्वर सोनवणे, पंढरीनाथ करपे, एकनाथ टेपले, एकनाथ महाराज, गोरक्षनाथ महाराज, योगेश महाराज,शहाजी महाराज निहाळ यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. संयोजक ह.भ.प.विष्णू महाराज सास्ते यांनी सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

कॅप्शन : राजुरेश्वराची महापूजा करतांना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे. समवेत साहेबराव भालेराव, भाऊसाहेब भुजंग, शिवाजी पुंगळे, उषाताई तोडावत आदी.

Web Title: Rajureshwar Janmotsav celebrated with enthusiasm