कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:22+5:302021-02-13T04:30:22+5:30

दामोधर सुबुगडे हे मंजुरांसोबत २८ जुलै २०१८ रोजी शेतात पाईपलाईनचे काम करीत होते. त्याचवेळी बाळाभाऊ बेंद्रे हा शेळ्या ...

Punishment of 10 years rigorous imprisonment for beating with an ax | कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कुऱ्हाडीने मारहाण करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

दामोधर सुबुगडे हे मंजुरांसोबत २८ जुलै २०१८ रोजी शेतात पाईपलाईनचे काम करीत होते. त्याचवेळी बाळाभाऊ बेंद्रे हा शेळ्या घेऊन आला. काही शेळ्या दामोधर सुबुगडे यांच्या पिकात गेल्या. दामोदर सुबुगडे त्याला म्हणाले की, शेळ्या शेतात का आणल्या, त्यांना तिकडे हकलून दे. त्याचा राग येऊन आरोपी बाळाभाऊ बेंद्रे याने दामोधर सुबुगडे यांना शिवीगाळ करून कुऱ्हाडीने डोके फोडले. या प्रकरणी कचरू कांगडे यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, सहायक सरकारी वकील अ‍ॅड. जयश्री सोळंके यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एफ. एम. ख्वॉजा यांनी आरोपी बाळाभाऊ बेंद्रे याला ३०७ भादंवि नुसार १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती अ‍ॅड. जयश्री सोळंके यांनी दिली.

Web Title: Punishment of 10 years rigorous imprisonment for beating with an ax