शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदनजवळील हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यापार उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 14:10 IST

भोकरदन-जालना रोडवरील हॉटेल प्रकाशगड येथे महिला देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी येतात याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांना मिळाली होती.

भोकरदन ( जालना ) : भोकरदन-जालना रोडवरील जवखेडा ठोबरे शिवारात असलेल्या हॉटेल प्रकाशगड येथे देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी टाकलेल्या धाडीत उघडकीस आले. यावेळी दोन महिलांसह हॉटेलच्या मॅनेजरला भोकरदन पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईनंतर दोन्ही महिलांची जालना येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

या बाबतची माहिती अशी की, भोकरदन-जालना रोडवरील हॉटेल प्रकाशगड येथे महिला देहविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी येतात याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक शालिनी नाईक यांना मिळाली होती. पोलिसांनी 24 जूनच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. यावेळी दोन महिला व पाच आंबटशौकीन ग्राहक हॉटेलच्या खोलीत थांबले होते. पोलिस आल्याची चाहूल लागताच पाचही ग्राहकांनी पळ काढला. यावेळी सिल्लोड येथील 45 व 46 वर्ष वयोगटातील दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्रीच भोकरदन येथील दिवाणी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. तसेच हॉटेलचा मॅनेजर अशोक दगडूबा राऊत ( 40 ) याला अटक केली आहे. हॉटेल मालक प्रकाश ठोबरे याच्या विरूद्ध कलम 3 व 4 स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध(पिटा) 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शालिनी नाईक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार, आर के तडवी, वाय.एस. पाडळे, व्ही. के. बावस्कर एस एम शिंदे, एस एम केंद्रे, रुस्तुम जैवळ, अनिल सवडे, अरुण वाघ,अभिजित वायकोस, सतिष लोखंडे, गणेश पिंपळकर यांनी केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना