सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:00+5:302021-02-07T04:29:00+5:30

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप ...

Preference is given to farmers who give sugarcane continuously | सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य

सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य

परतूर : आमच्या कारखान्याला सातत्याने ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचाच प्रथम विचार होणार आहे. उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता यामुळे सर्वांचाच ऊस जाईल याची शाश्वती देता येत नसल्याची खंत मॉ बागेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी लाेकमतशी बोलताना व्यक्त केली.

मॉ बागेश्वरी साखर कारखान्याने आतापर्यंत ३ हजार हेक्टरवरील ऊस आणून ३ लाख क्विंटल साखरेचे गाळप केल्याच्या पार्श्वभूमीवर चेअरमन शिवाजीरव जाधव बोलत होते. पुढे ते म्हणाले, उसाचे वाढलेले क्षेत्र व कारखान्याची गाळप क्षमता याचा विचार करता कारखाना मेपर्यंत चालवूनही दीड लाख मे. टन ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे. बागेश्वरीची गाळप क्षमता २ हजार ५०० मे. टन होती, ती आपण शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता ही क्षमता ३ हजार ४०० मे. टन केली आहे. आतापर्यंत ३ लाख मे. टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. अद्याप ५ लाख मे. टन ऊस उभा आहे. काराखान्याकडे नोंद नसलेला व बाहेर देण्यात आलेल्या ७५ हजार मे. टन उसाचा प्रश्न वेगळाचा आहे. डिसेंबरमधील ऊस मार्चमध्ये जात आहे. मे अखेरपर्यंत कारखाना सुरू राहिला तरी ५ लाख मे. टनापैकी ३.५ लाख मे. टनच उसाचे कारखाना गाळप करू शकतो. म्हणजे १.५ लाख मे. टन उसाचा प्रश्न अंधातरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे नोंदणी केल्याशिवाय नवीन उसाची लागवड करू नये, असेही शेवटी शिवाजीराव जाधव म्हणाले. या वेळी के. आर. निर्वळ, सरपंच मधुकर झरेकर, संतोष दिंडे आदी उपस्थित होते.

....

जालना जिल्ह्यात ६ लाख मे. टन अतिरिक्त ऊस

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मार्चनंतर काही ऊस बळीराजा साखर कारखाना पूर्णाकडे पाठवण्याचे नियोजन आम्ही करीत आहोत. पूर्ण जिल्हाभरात ५ ते ६ लाख मे. टन ऊस अतिरिक्त आहे. अधिकच्या उसाचा प्रश्न शासनाला कळविण्यात येईल, कारण सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झाले पाहिजे, मात्र उसाचे सातत वाढत जाणारे क्षेत्र व काराखान्याची मर्यादित गाळप क्षमता, यामुळे अडचण आहे.

.............

फोटो. पान ४ शिवाजीराव जाधव

Web Title: Preference is given to farmers who give sugarcane continuously