शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

आज देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:49 AM

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

जालना : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही ही स्पर्धा होणार असून, आज मंगळवारी शहरातील अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल येथे सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा आंतरशालेय असून, फक्त शाळेमार्फतच समूह सहभागी होऊ शकतात. प्रत्येक शाळेचा केवळ एकच समूह गायनासाठी सहभागी होऊ शकतो. समूहामध्ये कमीत कमी १० व जास्तीत जास्त २० विद्यार्थी असणे अपेक्षित आहे. गायन स्पर्धेसाठी लागणारे वाद्य व वादक शाळेने स्वत: आणायचे असून, कोणत्याही भाषेतील गाणे चालणार आहे. गायनासाठी ५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. या व्यतिरिक्त वाद्यवृंदांच्या तयारीसाठी २ मिनिटाचा वेळ देण्यात येईल. भाग घेतलेल्या ग्रुपने वेळेच्या एक तास आधी शाळेच्या समन्वयक शिक्षकांसह उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल व समूह गायन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय असे बक्षीस हे शाळेला देण्यात येईल. या व्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ बक्षीस राहील. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कॅम्पस क्लबतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेने मंगळवारी सकाळी वेळेत विद्यार्थी समूहासह कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून शाळेची नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल, श्रीनिवास डेकोरेशन, ओंकार डिजिटल ग्राफीक्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

टॅग्स :lokmat campus clubलोकमत कॅम्पस क्लबIndependence Dayस्वातंत्र्य दिवसmusicसंगीतStudentविद्यार्थी