शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाचा मार्ग सुखकर करण्यासाठी परमार्थ गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST

वरुड (बु.) : प्रभू नामात मोठी शक्ती असून, परमार्थ केल्यानेच माणसाच्या जीवनातील अवघड रस्ता सोपा होतो. त्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात ...

वरुड (बु.) : प्रभू नामात मोठी शक्ती असून, परमार्थ केल्यानेच माणसाच्या जीवनातील अवघड रस्ता सोपा होतो. त्यासाठी प्रत्येकाने दिवसभरात काळी वेळ तरी परमार्थ करावा, असे निरुपण ज्ञानेश्वर माउली महाराज शेलूदकर यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील भंडारगड येथे गुरुवारी आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. वरुड (बु.) येथील दिलीप वाघ यांच्या वतीने भंडारगड येथील उचं टेकडीवरील खंडोबा रायाच्या मंदिरासमोर गुरुवारी दुपारी हे कीर्तन झाले. आज विश्वास कुणावर ठेवावा हा मोठा प्रश्न आहे. कारण जगातील सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्या मागचे चेहरे ओळखणे होय. दुसऱ्याचा मोठेपणा व त्यांची प्रसिद्धी ही आपल्यातीलच काही लोकांना खूपत असल्यामुळे समाजातील लोंकाची दशा व हाल होत चालले आहेत.

या विश्वात संपत्तीला अनन्य साधारण महत्त्व दिले जात आहे. परंतु जगण्या- मरण्याचा हिशोब भंगवताकडे आहे. त्यासाठी आपण कितीही ही संपत्ती कमवली तरी ती काहीच कामाची नाही. कारण रिकाम्या हाताने आलो आहोत आणि रिकाम्या हातानेच जावे लागणार आहे. त्यामुळे माणूस म्हणून जगा आणि आपल्याकडील पैसा-संपत्ती समाजकारणासाठीदेखील खर्च करा, गरजुंना मदत करुन अन्नदान करा, असेही ज्ञानेश्वर माउली महाराज शेलूदकर म्हणाले. शेलूदकर महाराजांनी विविध दाखले देत उपस्थतांचे प्रबोधन केले.

भाविकांना महाप्रसादाचे वाटप

मागील महिन्यापासून दर रविवारी अनेक भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. गुरुवारी झालेल्या कीर्तन कार्यक्रमातही भाविकांना दिलीप वाघ यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

फोटो