शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मानेगाव आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधीसाठा

By admin | Updated: May 7, 2015 00:56 IST

जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’ च्या हॅलो जालनामधून प्रकाशित होताच

जालना : मानेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर राहत नसल्याने ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याचे वृत्त ‘लोकमत’ च्या हॅलो जालनामधून प्रकाशित होताच बुधवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे पथक तातडीने गावात पोहोचले. या केंद्राची तपासणी करून पंचनामा केला असता त्यात मुदतबाह्य औषधीसाठा आढळून आला. या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, रविवारी (दि. ३) केंद्र पूर्णपणे बंद असल्याचेही या पथकास निष्पन्न झाले.आज सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही.एम भटकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांचे पथक मानेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर दाखल झाले. ग्रामस्थ व अ.भा. मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी तत्पूर्वीच केंद्रास लावलेले कुलूप काढले होते. या पथकाने भेट दिली तेव्हा, सरपंच अनिल धनेश, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, माजी सभापती रमेश जाधव, अ‍ॅड. सोपान शेजूळ, संतोष ढेंगळे, श्रीकिशन कळकुंबे, नितीन भोकरे, राजाभाऊ ढेंगळे आदी उपस्थित होते. रविवारी केंद्रातीलच एका कर्मचाऱ्याच्या घरी लग्न असल्याने केंद्रातील सर्व कर्मचारी तेथे गेल्याचे व त्या दिवशी वैद्यकीय अधिकारी बाहेरगावी असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. त्यापाठोपाठ या अधिकाऱ्यांनी केंद्रातील औषधीसाठ्याची तपासणी केली असता, मुदतबाह्य झालेले २५ सलाईन तेथे आढळले. (प्रतिनिधी)४यावेळी अरविंंद देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे यंत्रणेवर नियंत्रण नसल्याचा आरोप केला. तसेच या आरोग्य केंद्रातील समस्येविषयी अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्याची दखल घेतली नसल्याचेही म्हटले. ४केंद्रात अस्वच्छता, शौचालयातील दुर्गंधी, अपूर्ण सेवापुस्तिका आढळून आल्याने या पथकाने केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. केंद्रातील रेकॉर्ड ताब्यात घेण्यात आले. याबाबतचा तपासणी अहवाल लवकरच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार असल्याचे पथकप्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.