शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

नामस्मरणाने मानवी जीवनाचा उद्धार होतो- सत्यात्मतीर्थ स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 00:55 IST

नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मानवी जीवन हे मागील जन्मातील पुण्याईमुळे मिळाले आहे. प्रत्येकाने मिळालेले हे जीवन सार्थकी लागावे, यासाठी ईश्वर, गुरूचे नामस्मरण केले पाहिजे, नामस्मरणातून तुमचे जीवन सफल आणि सुखमय होण्यास निश्चितपणे मदत होते, असे मार्गदर्शन श्रीमत उत्तरादी मठाधीश श्री श्री १००८ सत्यात्मतीर्थ स्वामी श्रीपाद यांनी केले.जालना शहरातील योगेश्वरी नगरमधील योगेश्वरी देवी मंदिरात शनिवारी त्यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधीवत पूजा करण्यात आली. प्रवचन कार्यक्रमात सत्यात्मतीर्थ स्वामी म्हणाले की, नामस्मरणाने केवळ व्यक्तीचाच उध्दार होतो, असे नाही तर त्याच्या कुळाचाही उध्दार होतो. आपण केलेले पाप हेच आपल्या दु:खाचे मूळ कारण असल्याचे त्यांनी सांगितले. नेहमी हसत चित्ताने राहिले पाहिजे. जीवन जगताना अनेक संकटं, प्रश्न हे निर्माण होत असतात. या प्रश्नांवर मात करण्यासाठी अध्यात्माची साधना आवश्यक आहे.नामस्मरण करत असताना आपले चित्त हे एकाग्र असले पाहिजे. त्यावेळी कुठलेही विचार मनात आणू नयेत. आपल्या थोर संतांनी देखील नामस्मरणाचे महत्त्व विशद केले आहे. यावेळी सत्यात्मतीर्थ स्वामी यांनी दररोजचे जीवन जगताना पूजा, अर्चा, जप-तप का केले पाहिजे याचे सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमास मूलराम पूजन, आरती, महाप्रसाद इ. कार्यक्रम पार पडले. मराठवाड्यातून स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीततेसाठी निवृत्त प्राचार्य सुरेश संदीकर, दीपक रणनवरे, संजय देशपांडे, किशोर देशपांडे, प्रफुल्ल निटूरकर, राजेंद्र वालूरकर, रवींद्र देशपांडे, धनंजय याडकीकर, सुनील कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुत्माचार्य यांनी केले तर आभार सोनाली देशमुख यांनी मानले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे