शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

ट्रक अपघाताचा बनाव करून केली सळई लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:52 AM

ट्रक पलटी झाल्याचा आणि सळई चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या चालकाला चंदनझिरा पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी अटक केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ट्रक पलटी झाल्याचा आणि सळई चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या चालकाला चंदनझिरा पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी अटक केली होती. अटकेतील चालकाकडे केलेल्या चौकशीनंतर धोंडराई व रामनगर तांडा (जि.बीड) शिवारातून चोरीस गेलेली व घटनास्थळी असलेली अशी एकूण ११ टन सळई चंदनझिरा पोलिसांनी शनिवारी जप्त केली आहे.जालना येथील संजय दुर्गाप्रसाद करवा यांच्या ट्रान्स्पोर्टमधून १३ नोव्हेंबर रोजी ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१६- टी. ५३१३) ११ टन सळई भरण्यात आली होती. ही सळई कोल्हापूर येथे पोहोच करण्यासाठी चालक कृष्णा गुलाब संत (रा. भोजगाव ता. गेवराई जि.बीड) हा ट्रक घेऊन गेला होता. मात्र, सांगली- सोलापूर मार्गावर ट्रकचा अपघात झाल्याची माहिती चालक संत याने ट्रक मालकाला दिली. त्यानंतर करवा यांनी चालकाला सतत फोन लावला तरी संपर्क होत नसल्याने करवा यांना संशय आला. त्यांनी या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि शामसुंदर कौठाळे यांनी ट्रकचा अपघात झालेल्या घटनास्थळाकडे पथकाला पाठविले.तपासाधिकारी अविनाश नरवडे, कर्मचारी कृष्णा भडांगे, नंदकुमार दांडगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.नातेवाईकांच्या शेतात टाकली होती सळईचालक कृष्णा संत याने माल घेऊन कोल्हापूरला जातानाच ट्रकमधील काही टन सळई नातेवाईकांच्या शेतात नेऊन टाकली होती. अपघातस्थळी असलेल्या ट्रकमध्ये काही टन सळई होती. चालकाने सळई लंपास केल्याची माहिती मिळाल्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करून सळई चोरीचा बनाव चालकाने केल्याचा पर्दाफाश केला.पोलीस कोठडीचालक संत याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला वाढीव पोलीस कोठडी सुनावली असून, त्याला ९ डिसेंबर रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीArrestअटक