जालना ठरला सायकल स्पर्धेत अव्वल; जिल्ह्याला मिळाले १३ विजयी स्पर्धक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:14+5:302021-02-06T04:55:14+5:30

यशस्वी सायकल रायडर्समध्ये सर्वात जास्त किलोमीटर सायकल चालविणारा नाशिक येथील स्पर्धक डॉ. जयराम डिखले यांनी सात दिवसांत तब्बल ...

Jalna tops cycling competition; The district got 13 winning contestants | जालना ठरला सायकल स्पर्धेत अव्वल; जिल्ह्याला मिळाले १३ विजयी स्पर्धक

जालना ठरला सायकल स्पर्धेत अव्वल; जिल्ह्याला मिळाले १३ विजयी स्पर्धक

यशस्वी सायकल रायडर्समध्ये सर्वात जास्त किलोमीटर सायकल चालविणारा नाशिक येथील स्पर्धक डॉ. जयराम डिखले यांनी सात दिवसांत तब्बल ५९९.४३ किलोमीटर सायकल चालवून प्रथम स्थान प्राप्त केले. विशेष बाब म्हणजे डॉ. जयराम यांचे वय ५३ वर्ष असून, त्यांनी सर्वसाधारण दररोज ८० किलोमीटर सायकल चालविली आहे. स्पर्धेचे दुसऱ्या क्रमांकाचे विजयी मानकरी ठरलेले ठाणे येथील ६८ वर्षांचे युवक प्रवीण कुमार कुलथे यांनी ५५८.१० किलोमीटर सायकल चालवून नवयुवकांसमोर आदर्श निर्माण केला. तिसऱ्या क्रमांकावर जालना जिल्ह्याचे विलास बोधले याने ५०६ किलोमीटर सायकल चालविली. चौथ्या क्रमांकावर तन्मय विलास बोधले याने एकूण ५००.४८ किलोमीटर सायकल चालविली.

उल्लेखनीय बाब म्हणजे ६० वर्षांवरील वयोगटामध्ये जालन्याचे डॉ. त्र्यंबक मगरे यांनी १०९.७८ किलोमीटर सायकल चालवून वयोवृद्धांना आवाहन दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज यांनी करून विजयी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निकालाची घोषणा क्रीडा विभागप्रमुख डॉ. हेमत वर्मा यांनी केली.

Web Title: Jalna tops cycling competition; The district got 13 winning contestants