शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही काम जिद्दीने केल्यास हमखास यश मिळते -गजानन मिसाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:22 IST

जालना : आपल्या यशात महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी शिकविलेल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन ...

जालना : आपल्या यशात महाविद्यालयातील सर्व अध्यापकांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी शिकविलेल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. सर्व शिक्षकांनी मला वेळोवेळी प्रेरणा देऊन माझे मनोबल वाढविले. त्यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील. तरुणांनी कोणतेही काम आवडीने व जिद्दीने केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन मांडवा गावचे सुपुत्र गजानन मिसाळ यांनी केले.

जिल्ह्यातील मांडवा गावचे सुपुत्र गजानन मिसाळ यांनी बुलेटच्या मागच्या लाइटवर बसून, दोन तास २७ मिनिटांत १११ किलोमीटर अंतर कापून विश्वविक्रम केला. मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे त्यांनी केलेल्या विश्वविक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा मत्स्योदरी अध्यापक विद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीने सत्कार केला. हा कार्यक्रम शहरातील यशवंत नगर येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. संजय काळबांडे म्हणाले की, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसेच आयुष्यात पालकांनी संपत्ती कमवण्यापेक्षा आपल्या पाल्यांना चांगले संस्कार दिल्यास त्यातून मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ असतो, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. वाल्मीक घुगे यांनी केले. प्रा. येवते, प्रा. मांटे, प्राचार्य वडजे, प्राचार्य अकोलकर, प्राचार्य तारगे, वर्षा चंद, सुशील ढाकणे, मनोज गायके, प्रमोद टोपे, अमोल मचे, छाया पवार, गीता गावंडे, प्रा. लक्ष्मण पानखडे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, बाळासाहेब आर्दड, मुकेश मुंडे, विनोद यादव, नितीन तोनगिरे, किरण गाडे, गौरव नांगरे, बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. दरगुडे यांनी केले, तर आभार प्रा. अभय हातोटे यांनी मानले.