शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 11:37 IST

वाळू तस्करांच्या चांडाळ चौकडीत मनोज जरांगे बसलेले आहेत, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): सरकार उलथून टाकायला जरांगेंकडे किती आमदार? असा सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे हे उपोषणवीर नाही, तर सलाईन लावून उपोषण करणारे 'सलाईन वीर' आहेत अशी टीका केली. तसेच वाळू तस्करांच्या चांडाळ चौकडीतच मनोज जरांगे बसलेले असल्याचा आरोप हाके यांनी केला. वडीगोद्री येथे हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हाके पुढे म्हणाले, अजित पवारांचे आमदार मुख्यमंत्र्यांना शिव्या देणाऱ्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान हाके यांनी विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांना दिले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत करत हाके यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला मराठा एकच आहे असेही सांगितले.

सरकारकडून दुजाभावगुन्हा दाखल होताच आम्हाला लगेच अटक केली जाते, अशी तत्परता जरांगेंच्या बाबतीत दाखवा. दोन वर्षांपासून जरांगे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेत, हजारो कर्मचाऱ्यांचा गृह विभाग असूनही राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यास एकदाही अटक केली नाही. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप हाके यांनी केला. 

ओबीसी वोटबँक जागी झाली तर...सरकार 14 ते 15 टक्के लोकांच्या मताला एवढे घाबरत असेल तर आमची तर 50 ते 60 टक्के मतांची वोट बँक आहे.  झोपलेल्या ओबोसींना जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ओबीसी आरक्षणा रक्षणासाठी जीव गेला तरी चालेल. ज्यादिवशी ओबीसी वोट बँक जागी होईल, त्यादिवशी यांना एखाद्या गावचा सरपंच सुद्धा आम्ही होऊ देणार नाही, असेही हाके म्हणाले.

टॅग्स :laxman hakeलक्ष्मण हाकेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षण