शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव येथील गिरिजा नदीत युवक गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 00:47 IST

भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर /जाफराबाद/ माहोरा: मागील तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटात परतीचा पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. परतूर तालुक्यातील सोयजना शिवारातील शेतात मंगळवारी दुपारी शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या युवतीचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तर दोन महिला ्रजखमी झाल्या. या आस्मानी संकटात गत तीन दिवसांत जिल्ह्यात सहा जणांचा बळी गेला आहे.जाफराबाद तालुक्यातील येवता (जि.जालना) येथील अंबादास माधवराव दळवी (४०) हे सोमवारी शेतात गेले होते. तोडलेली मिरची भिजू नये म्हणून झाडाच्या आडोशाला मिरची झाकून ठेवत होते. मात्र, दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने अंबादास दळवी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार डकले, पोहेकॉ सहाणे, मंडळाधिकारी गोत्राने, तलाठी देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयताच्या पार्थिवाचे ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मयत शेतक-याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.जिल्ह्यात मंगळवारीही पाऊस झाला. पाऊस आल्याने सोयजना (ता.परतूर) शिवारात शेतात काम करणा-या गजाला हबीब शेख (१९) व इतर महिला बैलगाडीखाली बसल्या होत्या. मात्र बैलगाडीवर वीज पडल्याने शेख यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिला जखमी झाल्या.विजयादशमीसाठी सोमीनाथ आला होता घरीसोमीनाथ गोरखोदे हा औरंगाबाद येथे सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. मंगळवारी विजयादशमी असल्याने तो घरी आला होता. मात्र, ऐन विजयादशमीच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे, मंडळाधिकारी किरण थारेवाल, दळवी, हसनाबाद ठाण्याचे बोर्डे, मोरे, सरपंच माधवराव हिवाळे आदींची उपस्थिती होती. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली.शोधकार्य : नदीकाठी नागरिकांचा जमावकेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. भोकरदन येथील अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेriverनदीRainपाऊस