निधीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:42+5:302021-02-05T08:06:42+5:30

चालकांची कसरत बदनापूर : शहरातील प्रमुख मार्गांची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यातून वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, अपघाताचा ...

Fundraising | निधीचे संकलन

निधीचे संकलन

चालकांची कसरत

बदनापूर : शहरातील प्रमुख मार्गांची मोठी दुरवस्था झाली आहे. खड्ड्यातून वाहने चालविताना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे, तरी संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

पथदिवे दिवसा सुरूच

जालना : शहरातील अनेक पथदिवे दिवसा सुरू राहत आहेत, तर अनेक भागात रात्रीच्या वेळी अंधार कायम आहे. त्यामुळे पालिकेने दिवसा सुरू राहणारे पथदिवे बंद ठेवून रात्री बंद राहणारे पथदिवे सुरू करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय

जालना : तालुक्यातील विविध गावांतील वीजपुरवठा सतत खंडत होत आहे. खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबत आहेत. त्यामुळे सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

रांजणीत शोभायात्रा

रांजणी : रांजणी येथे श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत रांजणीसह परिसरातील भाविक सहभागी झाले होते.

Web Title: Fundraising