शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जानकरांची परभणी मतदारसंघात आतापासून फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

रासपची दोन महिन्यांपूर्वीच शिर्डी येथे महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत रासपकडून आगामी म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ...

रासपची दोन महिन्यांपूर्वीच शिर्डी येथे महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत रासपकडून आगामी म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर हे परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आतापासून जानकर यांनी परभणी मतदारसंघात येणाऱ्या परंतु जालना जिल्ह्यात असणाऱ्या घनसावंगी आणि परतूर येथे संपर्क अभियान सुरू केले आहे. मंगळवारी जानकर यांनी घनसावंगी येथे मेळावा घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी घनसावंगी येथे बोलताना जानकर म्हणाले की, आमच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना रावबून जनतेला दिलासा देण्याचे काम केले. परंतु हे राज्य सरकार केवळ राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्या सरकारने कशी कसरत केली हे मी जवळून पाहिले असल्याचे जानकर म्हणाले. यावेळी जानकर यांच्या समवेत रासपचे जालना जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांची उपस्थिती होती.

आगामी काळात रासप हे सर्व निवडणुका या स्वबळावर लढविणार असल्याचे या पक्षाने या आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे देखील जानकर हे आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे जाळे विणले असल्याचे सांगण्यात आले. घनसावंगी येथे मंंगळवारी झालेल्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांनी दिली. आजच्या मेळाव्यास सभापती परमेश्वर वाघमोडे, अशोक लांडे आदींची उपस्थिती होती.