पारध-वालसावंगी रस्त्याची अभियंत्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST2021-02-15T04:26:44+5:302021-02-15T04:26:44+5:30

पारध ते वालसावंगी रस्त्याचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाले होते; परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ...

Engineers inspected the Pardh-Walsawangi road | पारध-वालसावंगी रस्त्याची अभियंत्यांनी केली पाहणी

पारध-वालसावंगी रस्त्याची अभियंत्यांनी केली पाहणी

पारध ते वालसावंगी रस्त्याचे काम पंधरा दिवसांपूर्वी सुरू झाले होते; परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले.

हा रस्ता महत्त्वाचा असल्याने हे काम तत्काळ पूर्ण होणे गरजेचे होते; मात्र पंधरा दिवस उलटूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यासंदर्भात कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. याबाबत शनिवारी ‘लोकमत’ने ‘पंधरा दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी बंद पाडलेले काम अद्यापही जैसे थे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम भोकरदन विभागाचे सहायक अभियंता डी. एन. कोल्हे आणि कंत्राटदार सुधाकर दानवे यांनी शनिवारी सकाळीच रस्त्याच्या कामाची पहाणी केली. हे काम तातडीने सुरू केले जाणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच शेखर श्रीवास्तव, गजानन लोखंडे, युनूस शेख, दिनेश सुरडकर व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Engineers inspected the Pardh-Walsawangi road