गरजू दुचाकीचालकांना हेल्मेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:19+5:302021-02-15T04:27:19+5:30

जालना : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आझाद मैदान भागातील भागीरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात ...

Distribute helmets to needy cyclists | गरजू दुचाकीचालकांना हेल्मेट वाटप

गरजू दुचाकीचालकांना हेल्मेट वाटप

जालना : रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आझाद मैदान भागातील भागीरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याच धर्तीवर शनिवारी देऊळगावराजारोडवरील दुचाकीचालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

जामवाडीजवळील देऊळगावराजारोडवर मोटार वाहन निरीक्षक नितीन पाटील, उदयसिंह साळुंके, वाहतूक शाखेचे स.पो.नि. कैलास नाडे, अमोल राठोड, साळुंखे यांच्यासह संचालक विकास काळे, सुधाकर वाडेकर, पांडुरंग मिसाळ, राम बडदे, बबलू बडदे, अजिंक्य काळे आदींच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले. गत काही महिन्यांपासून अपघातांची संख्या वाढली असून, यात दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर विकास काळे यांनी भागीरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना कोणत्या नियमांचे पालन करावे यांसह इतर बाबींवर मार्गदर्शन केले. दिवसभरात ५२ दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. ज्या दुचाकीस्वाराला हेल्मेट नसेल त्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट घालून हेल्मेट दररोज वापरण्याचेही आवाहन नितीन पाटील, कैलास नाडे, विकास काळे, उदयसिंह साळुंखे यांनी केले.

निबंध स्पर्धा घेणार

ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून नेहमीच विविध जनजागृती कार्यक्रम घेतले जातात. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या आनुषंगाने हेल्मेट वाटपाचा उपक्रम घेण्यात आला आहे. आगामी काळात प्रशिक्षण घेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

विकास काळे, संचालक, भागीरथी मोटार ड्रायव्हिंग स्कूल,

फोटो

Web Title: Distribute helmets to needy cyclists