भोकरदन तालुक्यातील चार गावच्या विद्यार्थिनींची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:38+5:302021-02-07T04:28:38+5:30

भोकरदन : तालुक्यातील मनापूर, दगडवाडी, मालखेडा, इब्राहिमपूर आदी गावातील विद्यार्थिनीसाठी मानव विकास मिशन योजनेअंतर्गत एसटी बस सुरू असून त्यामध्ये ...

Disadvantage of students of four villages in Bhokardan taluka | भोकरदन तालुक्यातील चार गावच्या विद्यार्थिनींची गैरसोय

भोकरदन तालुक्यातील चार गावच्या विद्यार्थिनींची गैरसोय

भोकरदन : तालुक्यातील मनापूर, दगडवाडी, मालखेडा, इब्राहिमपूर आदी गावातील विद्यार्थिनीसाठी मानव विकास मिशन योजनेअंतर्गत एसटी बस सुरू असून त्यामध्ये शेकडो विद्यार्थीनी भोकरदन येथे ज्ञानार्जनासाठी येत-जात असतात. परंतु ही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

तालुक्यातील मनापूर, दगडवाडी, इब्राहिमपूर, मालखेडा आदी गावातील विद्यार्थीनी दररोज भोकरदन येथे शिक्षणासाठी येतात. त्यांच्यासाठी मानव विकास योजनेची बस ही सुरु आहे, परंतु हीबस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थिनींना मानसिक व आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. शाळेची वेळ सकाळी साडेनऊ ते दुपारी दीडवाजेपर्यंत आहे. शाळेच्या वेळेस बस येत नाही तसेच शाळा सुटल्यावरही वेळेवर येत नाही. त्यामुळे मुलींची मोठी गैरसोय होत आहे.

आगारप्रमुखांना दिले निवेदन

बस वेळेवर सोडून विद्यार्थिनींचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय दळवी यांच्यासह विद्यर्थिनींनी भोकरदन आगारप्रमुख राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर शालिनी दळवी, निकिता दळवी, पुष्पा दळवी, पूजा दळवी, निकिता दळवी, विद्या दळवी, जयश्री दळवी, रुपाली इंगळे, गायत्री इंगळे, रुपाली दळवी, पल्लवी जाधव, सुचिता दळवी, वैष्णवी दळवी, जयश्री दळवी, मनीषा दळवी, पायल दळवी, शिवानी ठोंबरे, दिव्या पारवे, आरती पारवे, शारदा दळवी, कावेरी गायकवाड, सीमा पारवे आदी विद्यार्थिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

.......फोटो- पान ३ ... भोकरदन फोटो

Web Title: Disadvantage of students of four villages in Bhokardan taluka