कृषी विभागाने जमीन सुपिकता निर्देशांकासाठी फलक लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:21+5:302021-02-09T04:33:21+5:30

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी भुते, कृषी सहाय्यक शैलेश तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा मंडळातील एकूण ...

The Department of Agriculture put up panels for the Land Fertility Index | कृषी विभागाने जमीन सुपिकता निर्देशांकासाठी फलक लावले

कृषी विभागाने जमीन सुपिकता निर्देशांकासाठी फलक लावले

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी भुते, कृषी सहाय्यक शैलेश तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धावडा मंडळातील एकूण २३ गावांमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक एकाच दिवशी लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेले फलक तयार करण्यासाठी मागील तीन चार वर्षांत गोळा केलेल्या मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करून तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिकांचा वापर करण्यात आला. जमीन सुपिकता निर्देशांक तयार करताना चार घटकांवर आधारित एका गावाचे बारा वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. माती नमुन्यांचे परीक्षण केल्यामुळे रासायनिक खतांच्या वापरात ८ ते १० टक्क्यांनी घट होते तसेच पीक उत्पादनात देखील ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर दुरगडे यांनी सांगितले. पारध ग्रामपंचायत कार्यालयावर फलक लावण्यात आला.

फोटो ओळी : पारध बु. ग्रामपंचायत येथे जमीन सुपीकता निर्देशांक फलक लावताना कृषी सहाय्यक शैलेश तळेकर, शेतकरी रणजित ठाकूर, उमेश मोकासरे, रामेश्वर कोथलकर आदी.

Web Title: The Department of Agriculture put up panels for the Land Fertility Index