दीपक महाराज जोशी, जऱ्हाड यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:33+5:302021-03-04T04:57:33+5:30

बहुजन क्रांती सेनेचे साखळी उपोषण जाफराबाद : बहुजन क्रांती सेनेच्या वतीने भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघ्रुळ येथील ग्रामपंचायतीसमोर विविध ...

Deepak Maharaj Joshi, Jarhad felicitated | दीपक महाराज जोशी, जऱ्हाड यांचा सत्कार

दीपक महाराज जोशी, जऱ्हाड यांचा सत्कार

बहुजन क्रांती सेनेचे साखळी उपोषण

जाफराबाद : बहुजन क्रांती सेनेच्या वतीने भोकरदन तालुक्यातील सिरसगाव वाघ्रुळ येथील ग्रामपंचायतीसमोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण केले जात आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करावे, अहमदनगर जिल्ह्याचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर करावे यासह इतर मागण्यांसाठी गत काही दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.

प्रबोधन कला मंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जालना : कोरोनामुळे युवा प्रबोधन कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने युवा कलावंतांना मासिक आर्थिक मदत करावी, अशी मागणी युवा प्रबोधन कला मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भीमशाहीर जिल्हाध्यक्ष अनिल भदर्गे, जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, संस्थापक अध्यक्ष सुभाष साळवे, बाळासाहेब पडमुख, सुनील पडमुख आदींची उपस्थिती होती.

Web Title: Deepak Maharaj Joshi, Jarhad felicitated