शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Jalana: ओल्या दुष्काळासाठी अंबडमध्ये शेतकऱ्यांचा 'बोंब मारो मोर्चा', सरकारवर उगारला चाबूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:14 IST

अतिवृष्टीने पिकं खराब झाली, शेतकऱ्यांनी मोर्चात आणली; अंबडमध्ये मागण्यांसाठी जोरदार आंदोलन

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह इतर 20 मागण्यांसाठी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर बोंब मारो मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पीक सोबत घेऊन अंबड तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले. अंबड शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरापासून या मोर्चाची सुरुवात होऊन अंबड तहसील कार्यालयावरती धडकला. 

यावेळी सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जागे व्हा, असे म्हणत शेतकऱ्यांनी हातात चाबूक घेऊन तो जमिनीवर फटकारला. शेतकऱ्यांनी सोबत अतिवृष्टीने नुकसान झालेले सोयाबीन कापूस तूर व मोसंबी घेऊन सहभागी झाले होते. यावेळी सरकारला जागे करण्यासाठी बोंब मारत, 'जाहीर करा जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी एक जुटीचा विजय असो, जय जवान, जय किसान' अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तहसीलदार विजय चव्हाण यांनी शेतकऱ्याच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारले.

अंबड तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, शेतकऱ्यांना तोकडी रक्कम देऊ नका, पर्जन्यमापक यंत्र प्रत्येक मंडळात अद्यावत बसवा, पिक विमा व अनुदान याला क्षेत्र अटी शर्ती करू नये अशाही मागण्या करण्यात आल्या.

या आहेत शेतकऱ्याच्या मागण्या: - अंबड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा.- शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा, - कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांच्या मुलांची सरसकट शैक्षणिक फी माफ करा. - सन 2018 मंजूर असलेला खरीप पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करा.- ई-पिक पाहणी करण्यास शेतकर्यांना अडचणी येत असून पिक पाहणी ऑफलाईन करण्यात यावी.- फार्मर आईडी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. - नदी व नाल्याजवळील व पाणलोट क्षेत्राखालील माती खरडवून गेलेल्या जमीन मालकांना नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.- पीएम किसान योजनेतील प्रकरणे तत्काळ निकाली काढावी- पीएम किसान शेतकरी नोंदणी पोर्टल सुरु करावे.- पिक विमा कंपनीचे तालुका स्तरावर कायमस्वरूपी कार्यालय सुरु करावे,- शेतात राहणाऱ्या शेतकर्याना रात्रीची लाईट कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी,- अतिवृष्टी मुळे चारा नुकसान झाल्याने पशु पालकांना चार्यासाठी अतिरिक्त आर्थिक मदत करावी.- पिक नुकसान भरपाईसाठी क्षेत्र मर्यादा न ठेवता सरसकट भूधारकांना नुकसान भरपाई मदत करावी.- NDRF च्या नियमात प्रती हेक्टरी 5000 हजार रुपयांची वाढ करावी- नुकसान भरपाईसाठी कोरडवाहू, बागायती, फळबागायती अनुदांची अंमलबजावणी करावी.- थकीत कर्जदार शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा पिकविमा व अनुदान रक्कम शेतकर्यांना देण्यात यावी- पंचनामे झाल्यावर अनुदानाची रक्कम शेतकर्यांना 30 दिवसात वाटप करावी- रासायनिक खतासोबत इतर खतांची लिंकिंग करणाऱ्या वितरकावर कार्यवाही करावी.- रब्बीच्या पेरणीसाठी खत व बियाणे मोफत पुरवावे.- सन २०२४ अतिवृष्टी अनुदान पात्र शेतकर्याचे राहिलेले VK नं. देण्यात यावा

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस