एकाचा मृत्यू; ३० जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST2020-12-25T04:25:33+5:302020-12-25T04:25:33+5:30

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रूग्णाचा गुरूवारी मृत्यू झाला. तर गुरूवारीच ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

Death of one; Injure 30 people | एकाचा मृत्यू; ३० जणांना बाधा

एकाचा मृत्यू; ३० जणांना बाधा

जालना : कोविड रूग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रूग्णाचा गुरूवारी मृत्यू झाला. तर गुरूवारीच ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ४ वर गेली असून, आजवर ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

बाधितांमध्ये जालना शहरातील १२ जणांचा समावेश आहे. तर वाघरुळ १, मंठा तालुक्यातील पांगरी (बु.) १, परतूर शहर ४, घनसावंगी तालुक्यातील बेरगाव १, पारडगाव १, अंबड शहर ३, जाफाबाद तालुक्यातील खानापूर १, टेंभुर्णी १, भोकरदन शहर १, चांधई ठोंबरे १, चांधई ईको १, बुलढाणा १ तर औरंगाबाद येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ४ वर गेली असून, त्यातील ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर १२ हजार ३८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Web Title: Death of one; Injure 30 people