दोघांचा मृत्यू; १२ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:28 IST2020-12-24T04:28:01+5:302020-12-24T04:28:01+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला, तर बुधवारीच १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनामुक्त ...

Death of both; Injure 12 people | दोघांचा मृत्यू; १२ जणांना बाधा

दोघांचा मृत्यू; १२ जणांना बाधा

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला, तर बुधवारीच १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोनामुक्त झालेल्या ४४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

बाधितांमध्ये जालना शहरातील ७ जणांचा समावेश आहे, तर मंठा तालुक्यातील पांगरी (बु.) १, तळणी १, बुलडाणा २, मालेगाव (नाशिक) येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजवर एकूण १९ हजार २० संशयितांची तपासणी करण्यात आली. त्यातील १२ हजार ९७४ जणांचा मृत्यू झाला. त्यातील ३४१ जणांचा मृत्यू झाला, तर रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर आजवर १२ हजार ३६९ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या २६४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या एक लाख ९७ हजार ५४ इतकी झाली आहे.

Web Title: Death of both; Injure 12 people