बाबा, चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे; मुलांचा हट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:45+5:302021-02-09T04:33:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत विविध ...

Dad, no chocolate, I want a sanitizer; Children's hut | बाबा, चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे; मुलांचा हट्ट

बाबा, चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे; मुलांचा हट्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची भीती आणि त्यापासून घ्यावयाच्या दक्षतेसाठी विद्यार्थी आता चॉकलेट ऐवजी मास्क, सॅनिटायझरची मागणी करताना दिसत आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने पाचवी ते दहावीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहेत. पाचवी ते आठवीच्या वर्गात पन्नास टक्क्याहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती राहात आहे. कोरोनाविषयक सूचनांचे पालन करण्याबाबत शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना नेहमी सांगत आहेत. शाळेतही सॅनिटायझर, मास्क सक्तीचे करण्यात आले असून, हातही सतत धुण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी कोरोनापासून दूर आहेत.

एकही बाधित नाही

जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील शाळांमध्ये एकूण एक लाख ४७ हजार ४८३ विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी ७८ हजार ८४३ विद्यार्थी नियमित शाळेमध्ये येत आहेत. यामधील एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. सूचनांचे काटेकोर पालन केले जात असल्याने शालेय विद्यार्थी कोरोनापासून कोसो दूर आहेत.

विद्यार्थी म्हणतात...

कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने आमची शाळा सुरू झाली आहे. शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून आम्ही शाळेत काळजी घेत आहोत. घरूनही कधी-कधी सॅनिटायझर शाळेत नेत आहोत. कोणी दुर्लक्ष करत असेल तर शाळेतील शिक्षक सूचना देतात.

- वेदांती छल्लारे, वडीगोद्री

अनेक दिवसानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. आम्ही सरांनी दिलेल्या सूचनेनुसार मास्क घालून शाळेत जात आहोत. कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही घरूनच सॅनिटायझर घेऊन जाताे. शिवाय आम्ही सतत मास्कही बदलत आहोत. शाळा सुरू झाल्याने मित्रांसमवेत शिक्षण घेता येत आहे.

- ऋतुराज कदम, परतूर

शाळा सुरू होण्यापूर्वीच आम्हाला कोरोनाविषयक सूचनांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आम्हीही पालकांकडे सॅनिटायझर, मास्कची मागणी करत असतो. सॅनिटायझरचा नियमित वापर, मास्कचा वापर करूनच आम्ही शाळेत जातो. शाळेतही शिक्षकांकडून कोरोनासंबंधित नियमांच्या सूचना देण्यात येत आहेत.

- ऋतुजा खिल्लारे, वडीगोद्री

जिल्ह्यातील

शाळांची सद्यस्थिती

पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा १,८५८

सुरू झालेल्या शाळा १,८५८

विद्यार्थ्यांची उपस्थिती ७८,८४३

शिक्षकांची उपस्थिती १०,६२४

Web Title: Dad, no chocolate, I want a sanitizer; Children's hut