शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा तेरावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:38 IST

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४०७

ठळक मुद्देउपचारानंतर १० जणांना मिळाला डिस्चार्ज

जालना : शहरातील सदरबाजार परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मयत महिलेसह एकूण नऊ जणांचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला. तर यशस्वी उपचारानंतर १० जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जालना शहरातील सदरबाजार परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेला न्युमोनियाचा आजार असल्याने २३ जून रोजी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २४ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. मयत महिलेसह एकूण नऊ जणांचे अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आले आहेत.  यामध्ये जिल्हा क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले दोन कर्मचारी, जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात असलेल्या निवास स्थानातील एक, जालना शहरातील हनुमान नगर परिसरातील एक, सदरबाजार बाजार परिसरातील एक (मयत महिला), कालीकुर्ती परिसरातील एक, वैभव कॉलनी परिसरातील एक, जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील एक, जाफराबाद तालुक्यातील भारज येथील एक अशा एकूण नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या दहा जणांना गुरूवारी सकाळी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात जालना शहरातील गुडला गल्ली तीन, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन मधील तीन जवान, भाग्यनगर परिसरातील दोन, बालाजी नगर परिसरातील एक, भराडखेडा (ता. बदनापूर) येथील एक अशा एकूण दहा जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात आजवर एकूण ४०७ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून, त्यातील १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :Jalanaजालनाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस