coronavirus : जालन्यात कोरोनाचे आठ नवीन रूग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 10:43 IST2020-06-14T10:41:26+5:302020-06-14T10:43:10+5:30

जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या आता २७७ वर

coronavirus | coronavirus : जालन्यात कोरोनाचे आठ नवीन रूग्ण वाढले

coronavirus : जालन्यात कोरोनाचे आठ नवीन रूग्ण वाढले

ठळक मुद्देआठ बाधितांपैकी सहा जण हे जालना शहरातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत उपचारानंतर १५० जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज

जालना : रविवारी सकाळी नवीन आठ रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आठ बाधितांपैकी सहा जण हे जालना शहरातील आहेत. 

यामध्ये रामनगर मधील एक ३६ वर्षीय व्यक्ती, नानक निवास मधील एका ७ वर्षीय मुलगी, एक १४ वर्षीय मुलगी व एक ३८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील अलंकार थिएटरजवळील एक ४८ वर्षीय व्यक्तीचा व विठ्ठल-रूक्मिणी नगर मधील एक३२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील एक १८ वर्षीय मुलगा व एक ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या आता २७७ वर गेली आहे. त्यातील आठ जणांचा बळी गेला असून, उपचारानंतर १५० जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: coronavirus