Challenge The dead body of a stranger found in a field in Shivar | आव्हाना शिवारातील शेतात आढळला अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह
आव्हाना शिवारातील शेतात आढळला अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह

ठळक मुद्देखळबळ : घातपाताची शक्यता; ओळख पटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

आव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारातील शेतात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास समोर आली असून, या प्रकरणी भोकरदन ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील रामदास बजेबा गावंडे यांचे घारेवाडी शिवारातील शेत आहे. शेतकरी रामदास गावंडे व त्यांच्या पत्नी गुरूवारी शेतामध्ये काम करत होत्या. शेताच्या कपाशी मधील जमिनीमध्ये कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येत होता. तसेच उग्र वास येत होता. त्यामुळे गावंडे व त्यांच्या पत्नीने कपाशीच्या शेतात जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी एका महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील पार्थिव दिसून आले. त्यांनी लगेच गावातील पोलीस पाटील यांना माहिती दिली. पोलीस पाटील यांनी भोकरदन पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, पोनि दशरथ चौधरी, बीट जमादार नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महिलेचे पार्थिव सहा ते सात दिवसांपूर्वी येथे टाकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मागे घातपाताची शक्यताही वर्तविण्यात आली असून, पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे.
शवविच्छेदनासाठी पार्थिव औरंगाबादला
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मयत महिलेचे पार्थिव कुजून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे महिलेचा चेहराही ओळखू येत नव्हता. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चेअंती शवविच्छेदन औरंगाबाद येथे करण्याचा निर्णय घेतला. मयत महिलेचे पार्थिव औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात नेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Challenge The dead body of a stranger found in a field in Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.