शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह काढला बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:47 IST

पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी पहाटे पर्यंत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून बाहेर काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : पाय घसरून विहिरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी पहाटे पर्यंत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा करून बाहेर काढण्यात आला. ही घटना भोकरदन तालुक्यातील चांधई टेपली शिवारातील शनिवारी दुपारी घडली होती.चांधई टेपली येथील दिलीप सीताराम पवार (२३) हा युवक शनिवारी दुपारी शेतात गेला होता. विहिरीजवळ गेल्यानंतर पाय घसरल्याने तो आतमध्ये पडला. आसपासच्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर विहिरीकडे धाव घेऊन दिलीपला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, विहिरीत ४० फुटाच्यावर पाणी असल्याने तो सापडला नाही. यावेळी गावातील नागरिकांनी, नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस चौकीचे सहायक फौजदार शंकर काटकर, जमादार विष्णू बुनगे, होमगार्ड सुधाकर टेपले, परमेश्वर टेपले यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरू केले. परंतु विहिरीतील पाण्यामुळे दिलीपचा शोध लागला नव्हता.त्यानंतर विहिरीतील पाणी उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांनी विद्युत पंप व इंजिनच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसा सुरू केला. रविवारी पहाटेपर्यंत पाण्याचा उपसा केल्यानंतर दिलीपचा मृतदेह आढळून आला. राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर रविवारी दुपारी चांधई टेपली येथे मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत युवकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWaterपाणीdrowningपाण्यात बुडणे