कोरोनाबाबत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:57+5:302021-02-08T04:26:57+5:30

राणी उंचेगाव : माहिती व जनसंपर्क महासंचनालय महाराष्ट्र शासन आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यामाने भोकरदन ...

Awareness about corona through folk art | कोरोनाबाबत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

कोरोनाबाबत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती

राणी उंचेगाव : माहिती व जनसंपर्क महासंचनालय महाराष्ट्र शासन आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यामाने भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील भैरव बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कलापथकामार्फत कोरोना व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविली जात आहे. या अभियानाची सुरुवात घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथून करण्यात आली.

कोरोनाच्या काळात शासनाने केलेल्या विविध उपाययोजना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, याबाबत लोककलेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तालुक्यातील राणी उंचेगावसह, मच्छिंद्रनाथ चिंचोली, मानेपुरी, पानेवाडी, भायगव्हाण, तीर्थपुरी आणि राजेगाव आदी गावांमध्ये या कलापथकाद्वारे दि. ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती पथक प्रमुख रवी लोखंडे यांनी दिली. या पथकाता रवी लोखंडे यांच्यासह लोककलावंत गणेश कदम, पांडू लोखंडे, धनंजय देशमुख, नारायण बडनेरे, सुरेश लोखंडे, समाधान गायकवाड, दगडू जाधव, आश्रुबा हिवाळे, संतोष हिवाळे, शेख साजू, बाबू तबडे आदी कलावंत सहभागी आहेत.

फोटो ओळी

राणी उंचेगाव येथे कलापथक सादर करतांना कलावंत दिसत आहे.

Web Title: Awareness about corona through folk art