शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

१० रुपयांचे आमिष देऊन विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेने फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 16:49 IST

ग्रामस्थांनी अपहरणकर्त्यास बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले; अंबड तालुक्यातील शहागड येथील घटना

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथील एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न शहागड येथिल ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. अपहरणकर्त्याला शहागड येथील ग्रामस्थांनी पकडून चांगलाच चोप देऊन गोंदी पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी ११. ३० वाजेच्या दरम्यान शहागड बस स्थानकाजवळ घडली.

अंबड तालुक्यातील वाळकेश्वर येथिल राजविर अनिल पवार हा शहागड येथील जिल्हा परिषद शाळेत सहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. पोटात त्रास होत असल्याने राजविर शाळेतून लवकर बाहेर निघत घराकडे निघाला. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याचा पाठलाग सुरू केला. वाळकेश्वरकडे जाणाऱ्या शहागड बस स्थानकाजवळी बोगद्याजवळ दहा रुपयांची नोट देऊन त्याने राजविर याला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला.

ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत संशयित अपहरणकर्त्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. यावेळी ग्रामस्थांनी अपहरणकर्त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर ग्रामस्थानी त्याला गोंदी पोलीसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, संशयित ओडिशा येथील असून त्याचे नाव उनकू बाबाजी बसंतीया ( रा. खामोगा) असे आहे. तसेच तो वेडसर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी