शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ३६ टक्के पाण्याचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST

जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता, परंतु गत तीन महिन्यांत ...

जालना : गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला होता, परंतु गत तीन महिन्यांत जिल्ह्यातील प्रकल्पांमधून सरासरी ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

गतवर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सरासरी दीडशे टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्याच्या विविध भागात झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पूर्णत: वाया गेला. नव्हे, नदीकाठच्या शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघू प्रकल्प अशा एकूण ६४ प्रकल्पांमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला होता. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प भरल्याने भविष्यातील पाण्याच्या टंचाईचा प्रश्नही मार्गी लागला आहे, परंतु गत तीनच महिन्यांत या प्रकल्पांमधून तब्बल ३६ टक्के पाण्याचा उपसा करण्यात आला आहे. सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के तर लघू प्रकल्पांमध्ये ५६.८२ टक्के असा जिल्ह्यात एकूण ६३.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रकल्पनिहाय स्थिती पाहता, जिल्ह्यातील ६४ पैकी सहा प्रकल्पांमध्ये मृत पाणीसाठा आहे. दोन प्रकल्पांमध्येही ० ते २५ टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा असून, हे प्रकल्पही मृतावस्थेत जाण्याच्या मार्गावर आहेत. ९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये पाणीसाठा आहे. ३१ प्रकल्पांमध्ये ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये तर १६ प्रकल्पांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, गत तीन महिन्यांतच ३६ टक्के पाण्याचा उपसा झाला असून, जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ६३.६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. आगामी उन्हाळ्याचा कालावधी पाहता, जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणी उपशाचे नियोजन करणे गरजेचे आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्ये ७८.७३ टक्के पाणीसाठा आहे. यात जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात ७९.६३ टक्के, कल्याण मध्यम प्रकल्पात ८७.८९ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात ८२.१५ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात ६४.८४ टक्के, धामना प्रकल्पात ६९.५७ टक्के, जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ६८.१९ टक्के, अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ८१.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.