शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

३०० रोहित्रांची वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

फकिरा देशमुख भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी ...

फकिरा देशमुख

भोकरदन : थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरणकडून तालुक्यातील ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महावितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांकडील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात शेतकरी ग्राहकांची संख्या २५ हजार ३३० एवढी असून, एकूण थकबाकी ३२७ कोटी रुपये आहे. तालुक्यातील २ हजार ५०० रोहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन पीक शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले असताना महावितरणने वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत अत्यंत संतापाची लाट निर्माण झाली आहे. तालुक्यात मका, गहू, कांदा सिड्स, बाजरी, ज्वारी, हरबरा ही पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात आली आहेत. सदर पिके हे दाणे भरण्याच्या परिस्थितीत आहेत. नेमके अशाच परिस्थितीत महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास वाळून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारच्या या वीज बिल वसुली मोहिमेबाबत शेतकऱ्यांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे

शासकीय योजनेनुसार शेतकऱ्यांनी अर्धे थकीत वीज बिल भरले तर अर्धे थकीत वीज बिल माफ होणार आहे. तालुक्यातील अडीच हजार राेहित्रांपैकी ३०० रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल वसुलीचे तीन कोटी रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आजवर १३ लाख रूपये वसूल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचा लाभ घेऊन थकीत वीज बिल भरणे गरजेचे आहे.

दीपक तुरे, उप कार्यकारी अभियंता