शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदी दरम्यान १०० देशी दारूचे बॉक्स जप्त; दोनजण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 18:03 IST

या प्रकरणी दोघांविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबेकायदेशीरित्या देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणारे अटकेत

जालना : एका चारचाकी वाहनातून बेकायदेशीरित्या देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणाऱ्या दोघांना बदनापूर पोलिसांनी शनिवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. राहुल किसन वाडेकर (रा. ढोरपुरा रामनगर, जालना), मंगेश देविदास नाईक (रा. रामनगर पोलीस कॉलनी, जालना) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.  त्यांच्याकडून २,४९,६०० रूपये किंमतीचे देशी दारूचे १०० बॉक्स व २ लाख रूपयांची गाडी असा ४,४९,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

कायदा व सुव्यवस्था आणि अ‌वैध वाहतूक रोखण्याच्या अनुषगांने सकाळी तीन ते पाच वाजेपर्यंत नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते.  त्यानुसार शनिवारी सकाळी बदनापूर पोलीस नाकाबंदी करीत होते. नाकाबंदी करीत असताना संशयित वाहन क्रमांक (एमएच.२०.ई.६७०१) हे जालन्याकडे  येत होते. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता, त्यात देशी दारूचे बॉक्स दिसून आले. चालकास पोलिसांनी कागदपत्राविषयी विचारणा केली असता, त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांना नावे विचारली असता, राहुल वाडकेर व मंगेश नाईक अशी सांगितली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २,४९, ६०० रूपये किमतीचे १०० देशी दारूचे बॉक्स व २ लाख रूपयांची गाडी असा ४,४९,६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी दोघांविरुध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोनि. एम.बी. खेडकर  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नित्यानंद उबाळे, सपोउपनि निवृत्ती शेळके, पोहेकॉ. बुनगे, होमगार्ड पवार, गाडेकर, शिंदे, नबी, चालक दुर्गश राठोड यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना