जगातील या सर्वात मोठ्या मुस्लीम देशात जोडप्याला लगावले 140 चाबकाचे फटके, शरिया पोलिसालाही शिक्षा! कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 16:58 IST2026-01-30T16:52:24+5:302026-01-30T16:58:19+5:30

या भीषण शिक्षेदरम्यान संबंधित महिला बेशुद्ध पडली. यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले...

world's largest Muslim country Indonesia aceh province court sentenced to 140 lashes to couple Sharia policeman also punished | जगातील या सर्वात मोठ्या मुस्लीम देशात जोडप्याला लगावले 140 चाबकाचे फटके, शरिया पोलिसालाही शिक्षा! कारण काय?

जगातील या सर्वात मोठ्या मुस्लीम देशात जोडप्याला लगावले 140 चाबकाचे फटके, शरिया पोलिसालाही शिक्षा! कारण काय?

जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशियातील आचे प्रांतात एका महिलेला सार्वजनिकरीत्या १४० कोडे मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. या महिलेवर परपुरुषाशी संबंध ठेवणे आणि मद्यप्राशन केल्याचा आरोप होता. या भीषण शिक्षेदरम्यान संबंधित महिला बेशुद्ध पडली. यानंतर तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सार्वजनिक उद्यानात शिक्षेची अंमलबजावणी - 
एएफपी (AFP)ने दिलेल्या वृत्तानुसार, बांदा आचे येथील एका सार्वजनिक उद्यानात ही शिक्षा देण्यात आली. यावेळी तेथे डझनावर लोक उपस्थितीत होते. शरिया पोलीस प्रमुख मुहम्मद रिझाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जोडप्याला एकूण १४० कोडे मारले गेले. यात विवाहबाह्य संबंधांसाठी १०० आणि मद्यप्राशनासाठी ४० कोड्यांचा समावेश होता. 

आचे प्रांतातील स्वायत्तता आणि शरिया कायदा २००१ मध्ये आचे प्रांताला विशेष स्वायत्त राज्याचा दर्जा मिळाल्यापासून येथे शरिया कायदा लागू आहे. या कायद्यानुसार जुगार खेळणे, मद्यप्राशन, समलैंगिक संबंध आणि विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवणे हा दंडनीय अपराध मानला जातो. यापूर्वीही अनेकवेळा अशा प्रकारच्या कठोर शिक्षा येथे देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, "आम्ही नियमांच्या अंमलबजावणीत कोणतीही सूट देणार नाही, मग तो आमच्या विभागाचा सदस्य का असेना," असे रिझाल यांनी स्पष्ट केले. यात, वैयक्तिक जागेत आक्षेपार्ह स्थितीत सापडलेल्या एका शरिया पोलीस अधिकाऱ्याला आणि त्याच्या महिला जोडीदारालाही प्रत्येकी २३ कोडे मारण्यात आले आहेत.

Web Title : इंडोनेशिया: व्यभिचार के लिए जोड़े को सार्वजनिक रूप से कोड़े, शरिया पुलिस भी दंडित

Web Summary : इंडोनेशिया के आचे में व्यभिचार और शराब के लिए एक जोड़े को सार्वजनिक रूप से 140 कोड़े मारे गए। शरिया पुलिस अधिकारी को भी समान अपराधों के लिए दंडित किया गया, जो सख्त कानून प्रवर्तन को उजागर करता है।

Web Title : Indonesia: Couple Publicly Flogged; Sharia Police Also Punished for Offence

Web Summary : In Indonesia's Aceh, a couple received 140 public lashes for adultery and alcohol. A Sharia police officer was also punished for similar offences, highlighting strict law enforcement.