शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

इराणसोबत युद्ध वर्षभर चालणार?; मोसाद प्रमुखांनी इस्रायली पंतप्रधानांना दिलेला सीक्रेट रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:33 IST

इस्रायल आणि अमेरिका या दोघांच्या रणनीतीवर आता प्रश्न उभे राहिले आहेत. त्यात मोसाद प्रमुखांवरही निशाणा साधला जात आहे.

मध्य पूर्वेतील युद्ध आता हळूहळू दीर्घ काळ लढाईत बदलताना दिसत आहे. सुरुवातीला अमेरिकाइस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणची सत्ता लवकरच कोसळू शकते असं मानलं जात होते. मात्र आता नव्या इंटेलिजेंस रिपोर्टनं हे समीकरण बदललं आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या प्रमुखांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच इराणमध्ये सत्ताबदल शक्य आहे परंतु त्यासाठी वेळ जाईल. ही प्रक्रिया काही दिवसांत अथवा हफ्त्यात नाही तर जवळपास १ वर्षापर्यंत सुरू राहू शकते असं स्पष्ट केले होते. 

मोसादचे प्रमुख डेविड बार्निया यांनी इस्रायली कॅबिनेटसमोर युद्धाचे संभाव्य परिणाम समोर ठेवले होते. ज्यात काही महिन्यांचा कालावधीही समाविष्ट होता. परंतु सर्वात संभाव्य अंदाज १ वर्षाचा मानला गेला होता. परंतु युद्ध सुरू झाल्यानंतर चित्र आणखी बदलले. इराणमध्ये काही दिवसांत विद्रोह भडकू शकतो आणि तिथले सरकार पडू शकेल असा काही रिपोर्टने दावा केला होता. परंतु आतापर्यंत युद्ध सुरू झाल्यानंतर असं काही घडले नाही. रिपोर्टनुसार, ३ आठवड्यानंतर इराणची सत्ता कमकुवत झाली आहे परंतु आजही ती पूर्णपणे नियंत्रणात आहे हे दिसून येते.

इस्रायल आणि अमेरिका या दोघांच्या रणनीतीवर आता प्रश्न उभे राहिले आहेत. त्यात मोसाद प्रमुखांवरही निशाणा साधला जात आहे. मोसाद प्रमुखांनी इस्रायली सरकारला चुकीची आशा दाखवली असा काहींचा आरोप आहे. परंतु काही रिपोर्टमध्ये मोसाद प्रमुखांचे आकलन नेहमी सतर्क आणि अटींवर आधारित असते, ही कुठलीही भविष्यवाणी नसते अशी बाजू सावरून घेतली आहे. इराणमध्ये सत्ता परिवर्तन करणे इतके सोपे नाही. त्यासाठी काही अटी गरजेच्या आहेत. सर्वोच्च नेतृत्वाला कमकुवत करणे, सरकारी संस्थांना नुकसान पोहचवणे आणि जनतेचा विरोध वाढवणे, मात्र ही सर्व प्रक्रिया दीर्घ काळाचा हिस्सा आहे.

दरम्यान, अलीकडेच अमेरिकन इंटेलिजेंसचे प्रमुख तुलसी गबार्ड यांनी इराणमधील सरकार कमकुवत झालंय, पण ते आजही कायम आहे असं विधान केले. तर आम्ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतोय, मात्र तिथे सरकार पडणार की नाही हे सांगता येत नाही असं इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटलं. या संपूर्ण घटनाक्रमात अमेरिका आणि इस्रायल इतक्या दीर्घ युद्धासाठी तयार आहेत का हा प्रश्न निर्माण केला आहे. जर हा संघर्ष वर्षभर अथवा त्याहून अधिक चालला तर केवळ सैन्यावर नाही तर अर्थव्यवस्था, राजकारण आणि सामान्य लोकांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल. इराणमध्ये कुठलाही बदल अचानक होणार नाही हे स्पष्ट आहे. जर बदल झाला तर त्यासाठी बराच कालावधी जाईल. हेच या युद्धामागचे सत्य बनले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War Could Last a Year, Mossad Report Warns Israel.

Web Summary : Mossad predicts Iran war could last a year; regime change unlikely soon. Despite initial hopes, Iran's government remains stable, challenging US-Israeli strategies. Long conflict impacts economy, politics.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायलIranइराणAmericaअमेरिका