शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई रशियात? पुतिन यांनी विशेष विमान पाठवल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:26 IST

Mojtaba Khamenei Health Update: अमेरिकन हल्ल्यात इराणचे नवे नेते मोजतबा खामेनेई यांनी एक पाय गमावल्याचे वृत्त आहे. रशियामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून इराणने ही माहिती दडवली आहे.

मध्य आशियातील युद्धाने आता मुत्सद्दी आणि लष्करी स्तरावर एक नवे वळण घेतले आहे. इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांना गुप्तपणे उपचारासाठी रशियाची राजधानी मॉस्को येथे नेण्यात आल्याचा दावा कुवैती वृत्तपत्र 'अल-जरीदा'ने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वतः विशेष विमान पाठवून खामेनेई यांना मदतीचा हात दिला असल्याचे समजते.

वृत्तानुसार, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने केलेल्या ज्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनेई देखील गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पायावर आणि कंबरेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज होती. अशा परिस्थितीत पुतिन यांनी मोजतबा यांना मॉस्कोमध्ये उपचाराचा प्रस्ताव दिला.

कडक सुरक्षा आणि गुप्तता
मोजतबा खामेनेई यांना एका रशियन लष्करी विमानातून अत्यंत गुप्तपणे मॉस्कोला नेण्यात आले. सध्या ते पुतिन यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या एका खाजगी रुग्णालयात कडक सुरक्षेत असून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्टनुसार, त्यांचा पाय कापण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने आपला पाय गमावल्याची बातमी जर जनतेपर्यंत पोहोचली, तर लष्कराचे मनोबल खचू शकते, या भीतीपोटी इराण सरकारने ही माहिती पूर्णपणे दडवून ठेवली आहे.

इराणचा नकार
दुसरीकडे, इराण सरकारने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. "सर्वोच्च नेते पूर्णपणे निरोगी असून ते इराणमध्येच आहेत," असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.

रशिया-इराण मैत्री अधिक गडद
पुतिन यांनी मोजतबा खामेनेई यांच्या नियुक्तीनंतर त्यांना 'अटळ पाठिंबा' जाहीर केला होता. आता थेट वैद्यकीय मदत देऊन रशियाने या युद्धात इराणच्या बाजूने आपण खंबीरपणे उभे असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. यामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. इराणचे सर्वोच्च नेते अशा प्रकारे शारीरिकदृष्ट्या हतबल झाल्याने इराणच्या आगामी युद्धनीतीवर मोठा परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, रशियाने मोजतबा यांना दिलेला हा आश्रय आणि मदत अमेरिका व इस्रायलसाठी एक मोठे आव्हान मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's New Supreme Leader Khamenei in Russia? Putin Allegedly Sent Plane

Web Summary : Iran's new leader, Mojtaba Khamenei, was reportedly secretly flown to Moscow for treatment after being injured in an American airstrike. Putin allegedly sent a special plane. Iran denies this, claiming Khamenei is healthy and in Iran, despite reports of a leg amputation and Russian support.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन