शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा 'गोल्ड कार्ड' फॉर्म्युला; जगातील श्रीमंतांसाठी अमेरिकेची मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:18 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या गोल्ड कार्डसाठी ५ मिलियन डॉलर म्हणजेच ५० लाख डॉलर रक्कम खर्च करावे लागतील. भारतीय चलनात ही रक्कम ४३ कोटी इतकी आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धडाडीचे निर्णय घेण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. सध्या अमेरिकेच्या प्रत्येक निर्णयावर जगाचं लक्ष लागून राहिले आहे. एका मागोमाग एक असे धक्कादायक निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घेण्यात येत आहेत. त्यातच ट्रम्प सरकार लवकरच गोल्ड कार्ड(Gold Card) योजना सुरू करणार आहे. ही योजना ग्रीन कार्डच्या धर्तीवर सुरू करण्यात येत असून त्यात अतिरिक्त लाभही दिला जाणार आहे. या योजनेमुळे अमेरिकेत नागरिकता घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, आम्ही लवकरच गोल्ड कार्ड विकणार आहोत. हे ग्रीन कार्डसारखेच गोल्ड कार्ड असेल. त्याची किंमत ५ मिलियन डॉलर इतकी असेल. या कार्डच्या माध्यमातून ग्रीन कार्डसारखेच लाभ दिले जातील त्याशिवाय काही अतिरिक्त लाभही मिळणार आहेत. पुढील २ आठवड्यात ही योजना सुरू केली जाईल. त्यासाठी संसदेत मान्यता मिळण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

त्याशिवाय गोल्ड कार्डच्या माध्यमातून रशियातील श्रीमंत, अब्जाधीशही अमेरिकेचं नागरिकत्व घेऊ शकतात का असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना करण्यात आला. त्यावर शक्यता आहे, मी काही रशियातील अब्जाधीशांना ओळखतो, ते खूप चांगले आहेत, तेदेखील गोल्ड कार्ड मिळवू शकतात असं डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले. त्यातून ते अधिक श्रीमंत आणि यशस्वी होतील. त्यासाठी त्यांना खूप पैसा खर्च करावा लागेल आणि खूप करही भरावा लागेल. ही योजना चांगली यशस्वी होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. 

गोल्ड कार्ड घेणार EB-5 ची जागा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या गोल्ड कार्डसाठी ५ मिलियन डॉलर म्हणजेच ५० लाख डॉलर रक्कम खर्च करावे लागतील. भारतीय चलनात ही रक्कम ४३ कोटी इतकी आहे. गोल्ड कार्ड हे एकप्रकारे ग्रीन कार्डसारखेच असेल. नवीन गोल्ड कार्ड योजना EB-5 योजनेची जागा घेईल. गोल्ड कार्डमधून मिळणारी रक्कम थेट सरकारच्या तिजोरीत जाईल. गोल्ड कार्ड योजनेमुळे आम्ही EB-5 योजना संपुष्टात आणत आहोत असं ट्रम्प प्रशासनातील वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी सांगितले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका