शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:54 IST

भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्या अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी चीनला धमकी दिली आहे.

Donald Trump Warns China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. हा अतिरिक्त कर अमेरिकेकडून २७ ऑगस्टपासून लागू केला जाणार आहे. काही तासांनी हा अतिरिक्त कर लागू होईल. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. भारतावर कर लागू करण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, ट्रम्प यांनी चीनला धमकी देण्यास सुरुवात केली आहे. चीनविरुद्ध कठोर भूमिका घेत, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी चीनला इशारा दिला.  अमेरिकेकडे काही पत्ते आहेत, जर मी हे पत्ते खेळले तर चीन उद्ध्वस्त होईल. गरज पडल्यास अमेरिका  कठोर कारवाई करू शकते, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल एक मोठे विधान केले आहे. चीन आणि अमेरिकेतील संबंध आता सुधारत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मात्र भारत आणि चीनमधील वाढती जवळीक देखील ट्रम्प यांच्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. बदलती जागतिक समीकरणे अमेरिकेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे ट्रम्प यांनी थेट चीनला धमकी दिली. आपल्या निर्णयांमुळे चीनवर गंभीर परिणाम होऊ शकतो पण चांगल्या संबंधांसाठी त्यांचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं.

"अमेरिका चीनशी चांगले संबंध निर्माण करणार आहे. चीनशी आमचे संबंध उत्तम असतील. त्यांच्याकडे (चीन) काही पत्ते आहेत. आमचेही अविश्वसनीय असे पत्ते आहेत. पण मला ते पत्ते खेळायचे नाहीत. जर मी ते पत्ते खेळलो तर ते चीनला उद्ध्वस्त करतील. मी हे पत्ते खेळणार नाही," असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. ट्रम्प हे बोलत असताना दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग त्यांच्या शेजारी बसले होते.

दुसरीकडे, ट्रम्प यांनी टॅरिफबद्दल काहीही सांगितले नसले तरी, त्यांनी संकेत दिले की जर चीनने अमेरिकेला ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण उद्योगांसाठी आवश्यक असलेले मॅग्नेट पुरवले नाहीत तर ते २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादू शकतात. 'त्यांना आम्हाला मॅग्नेट द्यावे लागतील, जर त्यांनी हे केले नाही तर त्यांना २०० टक्के शुल्क किंवा दुसरे काहीतरी लादावे लागेल,' असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीनIndiaभारत