शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन परराष्ट्र विभागाचा मोठा 'कबूलनामा'; एकटा US जागतिक आव्हानांचा सामना करू शकत नाही, भारताची साथ महत्वाची

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 31, 2020 18:00 IST

मॉर्गन म्हणाले, हे दोन्ही देश संयुक्‍तपणे एक बलशाली आणि सुरक्षित राष्‍ट्र आहे. जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी हे दोन्ही देश संयुक्तपणे काम करत आहेत.

वाशिंग्टन - एकटी अमेरिका जागतिक आव्हानांचा सामना करू शकत नाही. यासाठी भारताची साथ अत्यंत आश्यक आहे. त्यामुळे कुणीही अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष झाले, तरी त्यांच्यासाठी भारताची साथ अत्यंत महत्वाची असेल, असे अमेर‍िकन परराष्ट्र विभागाचे प्रवक्‍ता मॉर्गन ऑर्टागस यांनी म्हटले आहे. 

मॉर्गन म्हणाले, हे दोन्ही देश संयुक्‍तपणे एक बलशाली आणि सुरक्षित राष्‍ट्र आहे. जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी हे दोन्ही देश संयुक्तपणे काम करत आहेत. विशेषतः इंडिया पॅसिफिक भागातील चीनचे प्रभूत्व कमी करण्याच्या दृष्टीने. पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, संपूर्ण जग लोकशाही मुल्यांसाठी संघर्ष करत आहे. मॉर्गन म्हणाले, लोकशाही कुठल्याही स्वरुपात परिपूर्ण नाही. मात्र, यात उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेचाही सहभाग आहे. 

कुठल्याही राजकीय पक्षाच्या दयेवर भारत-अमेरिका संबंध अवलंबून नाहीत -मॉर्गन म्हणाले, अमेरिका आणि भारत संबंध पूर्वीपेक्षाही बळकट झाले आहेत. तसेच ते भविष्यात अणखी बळकट आणि मधूर होतील. एवढेच नाही, तर या संबंधांच्या पाठीशी कुण्या राजकीय पक्षाचा अथवा एखाद्या व्‍यक्तीचा हात नाही. आता या दोन्ही देशांतील संबंध राजकीय पक्षाच्या विचारधारेपेक्षाही वरचे आहेत. हे कुठल्याही प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचे असेल. अमेरिकन राष्‍ट्राध्यक्ष पदाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 3 नोव्हेबरला होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रेटिकचा विजय होवो वा रिपब्लिकन पक्षाचा त्यांना भारताशी मधूर संबंध ठेवावेच लागतील. एवढेच नाही, तर अमेरिकन लोकांना माहीत आहे, की अमेरिका आणि भारत एकत्रितपणे अत्यंत मजबूत स्थितीत आहेत. हे दोघेही अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. एवढेच नाही, तर हे दोन्ही देश एकत्रितपणे अधिक सुरक्षित आहेत, असेही मॉर्गन म्हणाले.

10 वर्षांत जागतिक आव्हानांचा आकडा मोठा असेल -मॉर्गन म्हणाले, पुढील 10 वर्षांत जागतिक आव्हानांचा आकडा फार मोठा असेल हे आम्हाला माहीत आहे. ही आव्हाने आणखी गुंतागुंतीची होतील. अमेरिका आणि भारत एकसारख्या अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. या आव्हानांचा सामना अमेरिका एकट्याने करू शकत नाही. अम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे काम करावे लागेल. मॉर्गन म्हणाले, भारताबरोबरचे आमचे जागतिक भागितारी मोठी होत आहे. लोकशाही प्रक्रियेच्या बाबतीत दोन्ही देश मोठे आहेत. भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहेत. हे समान मुल्य दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, असेही मॉर्गन म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाUSअमेरिका