"आमच्या नौदलाशी बोला अन् जहाज घेऊन जा, परंतु..."; स्ट्रेट होर्मुझबाबत इराणचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 09:56 IST2026-03-13T09:55:27+5:302026-03-13T09:56:23+5:30

काही देशांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गाबाबत आमच्याशी चर्चा केली आहे आणि आम्ही त्यांना सहकार्य केले आहे असंही इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

US Isreal Iran War: "Talk to the Navy and take the ship, but..."; Iran big statement regarding the Strait of Hormuz | "आमच्या नौदलाशी बोला अन् जहाज घेऊन जा, परंतु..."; स्ट्रेट होर्मुझबाबत इराणचं मोठं विधान

"आमच्या नौदलाशी बोला अन् जहाज घेऊन जा, परंतु..."; स्ट्रेट होर्मुझबाबत इराणचं मोठं विधान

तेहरान - अमेरिकाइस्रायल आणि इराण यांच्या युद्धामुळे स्ट्रेट होर्मुझमधील तेल वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अनेक देशांची जहाजे या भागात अडकून पडली आहेत. स्ट्रेट होर्मुझ हा जगातील महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. मध्य पूर्वेतील तणावात इराणने स्ट्रेट होर्मुझ जलमार्गाला टार्गेट करत येथून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्यामुळे जगात इंधनचा तुटवडा जाणवू लागला आहे. स्ट्रेट होर्मुझमधून जहाज घेऊन जाण्याबाबत भारत सातत्याने इराणशी संवाद साधत आहे. त्यातच इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचं मोठं विधान समोर आले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून ज्या जहाजांना पुढे जायचे असेल त्यांनी इराणी नौदलाशी समन्वय साधावा असं इराणने म्हटलं आहे.

नौदलाशी चर्चेनंतर तुम्ही तेल आणि गॅस टँकर जहाजे स्ट्रेट होर्मुझमधून घेऊन जाऊ शकता. इराणच्या या विधानामुळे तिथले नौदल स्ट्रेट होर्मुझच्या वाहतुकीवर नजर ठेवून असून ते पूर्णपणे इराणच्या नियंत्रणात असल्याचे दिसते. यातून इराणनेही इस्रायल आणि अमेरिका वगळता इतर देशांच्या जहाजांना स्ट्रेट होर्मुझमधून प्रवास करण्याची मुभा देऊ शकते याचे संकेत मिळतात. परंतु अमेरिका, इस्रायल आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना ही परवानगी नाकारली जाईल असेही इराणचे उपपरराष्ट्र मंत्री यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच काही देशांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्गाबाबत आमच्याशी चर्चा केली आहे आणि आम्ही त्यांना सहकार्य केले आहे असंही इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. इराणवरील आक्रमणाला पाठिंबा देणाऱ्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवासाचा फायदा घेता येऊ नये असे इराणचे धोरण आहे. गुरुवारी इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच जाहीर निवेदन केले. त्यात इराण आपली लढाई सुरूच ठेवेल आणि अमेरिका-इस्रायल यांच्याविरोधात दबावतंत्र म्हणून स्ट्रेट होर्मुझ मार्ग बंद ठेवेल असं आव्हान दिले आहे.

कच्च्या तेलाचे दर वाढले

दरम्यान, मध्य पूर्वेतील येणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा खंडीत झाल्यानंतर किंमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या कच्चे तेल १०० डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात आहे. त्यामुळे एलएनजी दरातही वाढ झाल्याचे दिसून येते. इतकेच नाही येणाऱ्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचतील आणि हे युद्ध इतक्यात संपणार नाही अशी धमकीही इराणने दिली आहे.
 

Web Title : ईरान: होर्मुज से गुजरने के लिए नौसेना से समन्वय करें, लेकिन...

Web Summary : ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य से गुजरने वाले जहाजों के लिए अपनी नौसेना के साथ समन्वय की मांग की, कुछ देशों के लिए नियंत्रित मार्ग का संकेत दिया, उन देशों को छोड़कर जो ईरान के खिलाफ कार्रवाई का समर्थन करते हैं। आपूर्ति चिंताओं के बीच तेल की कीमतें बढ़ीं।

Web Title : Iran: Coordinate with navy to pass Hormuz, but...

Web Summary : Iran demands coordination with its navy for ships passing through Hormuz Strait, hinting at controlled passage for some nations, excluding those supporting actions against Iran. Oil prices surge amid supply concerns.