ट्रम्पनी माणुसकीही सोडली...? शाळेतून येत होता चिमुरडा, ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:31 IST2026-01-23T10:30:36+5:302026-01-23T10:31:32+5:30

US Immigration Detain 5-year-old child : अमेरिकेच्या मिनीयापोलिसमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी एका ५ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलाचा वापर 'बैट' म्हणून केल्याचा शाळा प्रशासनाचा आरोप.

US Immigration Detain 5-year-old child: Has Trump abandoned humanity?... A child was coming from school, Trump's officers chased him and took him into custody. | ट्रम्पनी माणुसकीही सोडली...? शाळेतून येत होता चिमुरडा, ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत घेतले ताब्यात 

ट्रम्पनी माणुसकीही सोडली...? शाळेतून येत होता चिमुरडा, ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग करत घेतले ताब्यात 

अमेरिकेतील मिनीयापोलिस शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एनफोर्समेंटच्या अधिकाऱ्यांनी एका ५ वर्षांच्या मुलाला त्याच्या वडिलांसह ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या चिमुरड्याचा वापर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना घराबाहेर काढण्यासाठी 'आमिष' म्हणून केल्याचा खळबळजनक आरोप शाळा प्रशासनाने केला आहे.

५ वर्षांचा लिआम कोनेजो रामोस हा आपल्या वडिलांसोबत प्री-स्कूलमधून घरी परतत होता. ते त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये पोहोचले असता, पाठलाग करत असलेल्या फेडरल एजंट्सनी त्यांना अडवले. एजंट्सनी त्या ५ वर्षांच्या मुलाला त्याच्या घराचा दरवाजा ठोठावण्यास भाग पाडले, जेणेकरून घरातील इतर लोक बाहेर येतील, असा आरोप शाळा अधीक्षिका झेना स्टेनविक यांनी केला आहे. 

मुलाचे वडील एड्रियन अलेक्झांडर कोनेजो आरियास इक्वेडोरचे नागरिक आहेत. ते अमेरिकेत आश्रय मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत होते. मात्र, एजंट्सनी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतले.

तपास यंत्रणेचे स्पष्टीकरण
या घटनेवर अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने आपली बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आमचे लक्ष्य तो मुलगा नव्हता, तर त्याचे वडील होते, जे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते. जेव्हा अधिकाऱ्यांनी वडिलांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते मुलाला सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मुलाच्या सुरक्षिततेसाठी एका अधिकाऱ्याने त्याला आपल्या ताब्यात ठेवले आणि नंतर वडिलांना अटक केली.

मुलाची रवानगी डिटेंशन सेंटरमध्ये
सध्या या ५ वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना टेक्सासमधील एका 'डिटेंशन सेंटर'मध्ये पाठवण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर अमेरिकेत मानवाधिकार संघटना आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "५ वर्षांचा मुलगा गुन्हेगार कसा असू शकतो?" असा सवाल झेना स्टेनविक यांनी विचारला आहे. हे कृत्य योग्य नसल्याची टीका माजी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी केली आहे. 

Web Title : ट्रम्प प्रशासन पर आप्रवासन गिरफ्तारी में बच्चे को चारा बनाने का आरोप

Web Summary : अमेरिकी आव्रजन अधिकारियों पर इक्वाडोर के शरण चाहने वाले एक 5 वर्षीय लड़के को उसके पिता को गिरफ्तार करने के लिए चारा के रूप में उपयोग करने का आरोप है, जिससे आक्रोश और निंदा हुई है।

Web Title : Trump administration allegedly used child as bait in immigration arrest.

Web Summary : US immigration officials are accused of using a 5-year-old boy as bait to arrest his father, an Ecuadorian asylum seeker, sparking outrage and condemnation.