शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्पनी शेअर केलेल्या फोटोतला 'तो' कुत्रा झाला बरा अन् परतला कामावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 14:10 IST

इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला कुत्रा अखेर बरा होऊन पुन्हा ड्युटीवर परतला आहे.

वॉशिंग्टनः इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला कुत्रा अखेर बरा होऊन पुन्हा ड्युटीवर परतला आहे. उत्तर सीरियातल्या एका भूमिगत सुरूंगात इसिसचा म्होरक्या बगदादीचा पाठलाग करताना अमेरिकी लष्करातील एक कुत्रा जखमी झाला होता. आमच्या के 9 श्वान पथकातील सुंदर आणि प्रतिभावान कुत्रा जखमी झाल्याचंही ट्रम्पनी ट्विट केलं होतं. त्यांनतर पेंटागॉनच्या एका प्रवक्त्यानं पत्रकार परिषदेत तो कुत्रा बरा होऊन कामावर परतल्याची माहिती दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून तो लष्करात कार्यरत आहे. पण त्यांचं नाव उघड केलेलं नाही.बगदादीवर हल्ला केल्यानंतर सुरुंगात त्या कुत्र्याला शॉक लागला होता. त्यामुळे तो जखमी झाला. परंतु आता तो ठीक असून, कामावर परतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कुत्र्याचा फोटो शेअर केला होता. तसेच त्यांनी कुत्र्याचं नाव उघड केलं नसलं तरी बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कुत्र्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. विशिष्ट प्रजातीचे हे कुत्रे व्यक्तीची ओळख पटवण्यात सराईत असतात. लष्कराचे हे महत्त्वाचे सदस्य आहेत. तसेच काही विशेष अभियानात ते सेनेबरोबर काम करतात. तसेच फक्त सेनेबरोबरच काम करत नाही, तर शत्रूंची ओळख पटवून जवानांचं संरक्षण करतात. 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका